पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/202

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जोडण्याची जी धार्मिक प्रेरणा माणसाच्या ठिकाणी असते त्याचे समाधान करील असं हे तत्त्वज्ञान आहे."
 इस्लाम आणि मार्क्सवाद यांच्यात हे आणखी एक साम्य आहे. इस्लामला भाष्यकारांनी बंदिस्त करून टाकले तसाच काहीसा प्रकार मार्क्सवादाच्या बाबतीतही घडलेला दिसतो. खरे तर मार्क्सवादामधील अंत:संघर्ष हा एका स्वतंत्र क्रांतीचा विषय होऊ शकतो. लेलिन-स्टॉलिनच्या काळातील रोझा लुक्झेंबर्ग, ट्रॉटस्कीपासून शरद पाटलांपर्यंत हा अंत:संघर्ष चालला आहे. रोझाची आठवण कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांनी आपल्याला मुलीला तिचं नाव ठेवून जागृत ठेवली एवढंच. देशमुखांच्या कादंबरीत डांग्याचे उल्लेख येऊन जातात याची जाता जाता नोंद घ्यायला हवी.
 जागतिक पातळीवर ठिकठिकाणाच्या साम्यवादी पक्षांची सूत्रे रशियाकडे गेली कारण रशियामध्ये साम्यवादी राजवट होती व तिच्याकडून या पक्षांना रसद मिळायची. पर्यवसान रशियाच्या वर्चस्वात झाले. आणि रशियन कम्युनिस्ट मार्क्सवादाचा जो अर्थ लावतील तोच प्रमाणभूत असे मानण्याकडे इतर कम्युनिस्टांची प्रवृत्ती होऊ लागली. असे असले तरी भारतीय कम्युनिस्ट आपले स्वत्व राखण्यात त्यातल्या त्यात यशस्वी झाल्याची देशमुखांची धारणा आहे. ती आनंद आणि अनघा या भारतीय कॉग्रेड दंपतीच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसते. साम्यवादाला अभिप्रेत असल्याप्रमाणे हे जोडपे निधर्मी आहे. मात्र धर्म आणि संस्कृती यांच्यातील फरक त्याला चांगलाच समजतो. धर्माला दूर ठेऊन सांस्कृतिक सोहळे, उत्सव साजरे करून जीवन अर्थपूर्ण करीत त्याचा आनंद कसा घ्यायच्या याचे इंगित या दोघांना कळलेले असते. ते पाहून अफगाणी कॉमेडस् चकित होतात. हिंदूना हे शक्य होते तर मुसलमानांना का होऊ नये? इस्लाम हा हिंदू धर्माच्या तुलनेत सर्वंकष आणि बंदिस्त असण्याच्या हा परिणाम असाव्या हे उघड आहे. इस्लामी संस्कृतीत धर्म जीवनाच्या कोणत्याही क्षेत्राला आपल्या कक्षेच्या बाहेर ठेवण्याची परवानगी देत नाही. इतरत्र धर्म हे संस्कृतीचे एक अंग असते. कदाचित अत्यंत महत्त्वाचे अंगही असेल. पण धर्माला पुरून संस्कृती दशांगुले उरते, तसे इलाममध्ये होत नाही. तेथे धर्मच संस्कृतीला व्यापून राहिलेला आहे.

अशा प्रकारची सार्वभौम सर्वकषता हे जसे इस्लामचे वैशिष्ट्य आहे तसेच ते मार्क्सवादाचेही आहे. आता या वैशिष्ट्याचा जसा चांगला उपयोग करता येणे शक्य आहे. तसा गैरवापरही शक्य आहे. त्यामुळे टीकेचा रोख त्या विचारसरणींच्या विरुद्ध न राहाता त्यांच्या दुरुपयोग करणाऱ्यांच्या विरुद्ध असला पाहिजे. व त्यांच्या विषयातून या विचारसरणींना मुक्त करण्याच्या प्रयत्न करायला हवा. असे करता आले तर दोन्ही विचारांमधील योग्य गोष्टींच्या समन्वय करता येईल. इस्लामवर

अन्वयार्थ □ २०३