पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/363

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केशव तुपे (२६.१.१९७१) विदर्भ शासकीय महाविद्यालय, अमरावती, येथे मराठीचे प्राध्यापक व विभाग प्रमुख. नव्या पिढीतील समीक्षक. साहित्य - सर्जन आणि संदर्भ, ही पुस्तके प्रकाशित. विविध नियतकालिकांतून समीक्षालेख प्रकाशित. पत्ता : सहयोगी प्राध्यापक व प्रमुख, पदव्युत्तर विभाग, शासकीय विदर्भ ज्ञानविज्ञान संस्था, अमरावती ०४. मो. ९४२०२८५८७८ भ. मा. परसावळे मराठीतले एक ज्येष्ठ कवी. 'असेही' आणि 'रस्ते दुभंगत आहेत' हे दोन कवितासंग्रह व कलात्मक मुखपृष्ठ व रेखाचित्रे त्यांनी निर्मिली आहेत. पत्ता : नारायण नगर, हिंगोली ४३१५१३ फोन : ०९४०३२२४१३० AA आनंद पाटील (१९४५) एम. ए., पीएच. डी. नामवंत लेखक व समीक्षक. इंग्रजी भाषा साहित्याचे अध्यापन. गोवा विद्यापीठाच्या इंग्रजी विभागात दीर्घकाळ अध्यापन. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या (नांदेड) भाषा व साहित्यसंकुलाचे प्राध्यापक व संचालक म्हणून निवृत्त. कागूद आणि सावली, इच्छामरण या दोन कादंबऱ्या प्रकाशित. फुगड्या, दावण, सुपर्ण वृक्षाखाली भर दुपारी, फेरा - हे कथासंग्रह प्रकाशित. पाटलाची परदेशवारी हे प्रवासवर्णनपर पुस्तक. मराठी नाटकावरील इंग्रजी प्रभाव, तौलनिक साहित्य : नवे सिद्धान्त आणि उपयोजन, ब्रिटिश बॉम्बे आणि पोर्तुगीज गोव्यातील वाङ्मय, तुळव. साहित्य : काही देशी आणि काही विदेशी, टीकावस्त्रहरण, समीक्षा 'अपहरण हे समीक्षा ग्रंथ प्रकाशित. काही ग्रंथांचा अनुवाद. पत्ता : ८९ गीतानंद, अरुणोदय हाऊसिंग सोसायटी, शाहू पार्क, राजेद्रनगर जवळ, कोल्हापूर - ०४. मो. ९४०४१४०९९५ विष्णू नारायण पावले (३ जानेवारी १९८७) शिवाजी विद्यापीठाच्या 'कमवा आणि शिका' योजनेतून मराठी विषयात विशेष प्रावीण्यासह एम. ए. 'पहिलं पाऊल' हा कवितासंग्रह प्रकाशित. कविता, कथा, ललितगद्य व ३६४ ० अन्वयार्थ