पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/366

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

व्याख्याने. रंग नाटकाचे हे पुस्तक प्रसिद्ध. जहन्नम (प्रतिमा जोशी यांच्या कथा) व 'आम्हाला भेटलेले श्रीराम लागू' या पुस्तकांचे संपादन. पत्ता : ६, राधामंदिर, २१३ सर भालचंद्र मार्ग, माटुंगा, मुंबई फोन - २४१४११३६ १ ३ १ महेंद्र कदम विठ्ठलराव शिंदे कला वाणिज्य महाविद्यालय, टेंभुर्णी ता. माढा (जि. सोलापूर) येथे प्राचार्य म्हणून कार्यरत. ललित लेखक व अभ्यासक. धूळपावलं व आगळ या कादंबऱ्या प्रकाशित. 'जो भितो त्याची गोष्ट' हा कथासंग्रह. कादंबरी सार आणि विस्तार, कवितेची शैली, भाषाविज्ञान परिचय हे ग्रंथ प्रकाशित. आगळ या कादंबरीस भैरूरतन दमाणी साहित्य पुरस्कार. विविध नियतकालिकांतून व ग्रंथांतून लेखन. पत्ता : प्राचार्य : विठ्ठलराव शिंदे कला वाणिज्य महाविद्यालय, टेंभुर्णी, ता. माढा, (जि. सोलापूर) अशोक चौसाळकर राज्यशास्त्राचे नामवंत अभ्यासक. शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागातून प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून निवृत्त. समाज प्रबोधन पत्रिका या त्रैमासिकाचे संपादक. नवरात्र, महाभारतातील न्याय संकल्पना, आधुनिक विचारप्रवाह ही पुस्तके प्रकाशित. राज्यशास्त्राविषयी सातत्याने लेखन. विविध संपादने. पत्ता : ४१६, आर. के. नगर हौसिंग सोसायटी नं. ६, पाचगाव, कोल्हापूर. रफिक सूरज मुल्ला (१९ मार्च १९७०) । डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग इन् डिझायनिंग अँड डेकोरेशन. एम. ए., पीएच. डी., इचलकरंजी येथे वरिष्ठ महाविद्यालयात मराठी विषयाचे प्राध्यापक, सोंग घेऊन हा पोर हा कवितासंग्रह, आभाळ, बेबस हे कथासंग्रह, रहबर ही कादंबरी, आवडनिवड या आणि लघुनियतकालिकांची वर्णनात्मक सूची हा समीक्षात्मक लेखनसंग्रह. साहित्य अकादेमीच्या प्रवासी शिष्यवृत्तीतून कर्नाटक राज्याचा अभ्यासदौरा. कवितांचे हिंदी, कन्नड भाषांतून अनुवाद. पत्ता : प्लॅट नं. ३८, शांतीनगर, हुपरी, जि. कोल्हापूर ४१६२०३ मो. ९४२२४२७५०१ अन्वयार्थ । ३६७