पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/102

हे पान प्रमाणित केलेले आहे.

बॉम्ब बनवणे म्हणजे सिंहाची शिकार नाही, खोकडाचे शवखादन आहे.
 शस्त्र नसलेले अस्त्र
 मुद्दा तीन - अणुबॉम्ब संपादन केल्यामुळे भारताच्या संरक्षण सामर्थ्यात काहीही मोठा फरक पडणार नाही. अणुयुद्धात विजेता कुणीच असू शकत नाही. शीतयुद्धाच्या काळात रशिया आणि अमेरिका या महासत्तांनासुद्धा अन्नवस्त्रांचा उपयोग फक्त धाक दाखवण्यापुरता झाला. रशियन साम्राज्य कोसळत असतानादेखील आपल्याबरोबर जगाचा विनाश करण्याचा विचार झाला नाही. अणुबॉम्बने सामर्थ्य मिळते त्यापेक्षा जबाबदारी जास्त वाढते. हिंदुस्थानसारख्या गरीब राष्ट्रांना त्याचा आर्थिक बोजाही न सोसणारा आहे.
 हिंदुस्थानी बॉम्ब वापरणार कोणाविरुद्ध? श्रीलंकेविरुद्ध नाही, चीनविरुद्ध नाहीच नाही, राहता राहिला पाकिस्तान; त्यावर एक डझनभर बॉम्ब टाकता येतील. पाकिस्तानही तितकेच बॉम्ब टाकू शकेल. आंतरराष्ट्रीय व्यवस्था अशा परिस्थितीत इतकी कडाडून कोसळेल, की विजयाला काहीच अर्थ उरणार नाही. कोणतीही समस्या अणुबॉम्बचा वापर करून सोडवण्याच्या लायकीची नाही. युद्धाच्या दुष्टीने अणुबॉम्ब निव्वळ निरुपयोगी गोष्ट आहे. तेवढ्याच खर्चात संरक्षणाची कितीतरी अधिक प्रभावी यंत्रणा तयार करता येईल.
 मुद्दा चार - अणुबॉम्बची चैन हिंदुस्थानसारख्या, गारीब देशात परवडणारी नाही, त्याकरिता लागणारी साधनसामग्री शास्त्र आणि विज्ञान किंवा विकासाच्या इतर कोणत्याही कामाकरिता वापरली तर त्यातून अणुबॉम्बच्या बेगडी ऐटीऐवजी खराखुरा महान भारत राहू शकेल.
  'आहे रे'च्या चिंता

 हे चार मुद्दे स्पष्ट झाले म्हणजे शेवटचा आणि सर्वांत महत्त्वाचा विषय स्पष्ट होईल. अमेरिका आदी 'आणु आहे रे' हे देश विनाकारण दादागिरी करून हिंदुस्थानसारख्या देशावर निर्णय लादतात, आमचा अपमान करणे, आमच्या सार्वभौमत्वाला धक्का लावणे, एवढाच त्यांचा दुष्ट हेतू आहे असे अनेकांना वाटते.
 'आहे रे' राष्ट्रांना वाटणारी चिंता समजावून घेणे आवश्यक आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर अणुबॉम्ब संपादन केलेल्या सर्व राष्ट्रांना ज्याच्या त्याच्या हाती अणुबॉम्ब गेला तर काय परिस्थिती उद्भवेल याबद्दल चिंता वाटणे साहजिक आहे. देशात जसे शस्त्रनियंत्रण तसे जगात अणुनियंत्रण पाहिजे असे त्यांना वाटते. अणुवीज केंद्रातील उत्सर्जन द्रव्यांची विल्हेवाट व्यवस्थित लागते किंवा

अन्वयार्थ - एक / १०३