पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/16

हे पान प्रमाणित केलेले आहे.

अवस्थेत आले आहे. नोंदवू लागले आहे. मानसोपचार शास्त्र याच्या नेमक्या उलट्या दिशेने पुढे जात आहे. मनोरुग्णांच्या आयुष्यात पूर्वी घडलेल्या घटना, दुःख, धक्के यापेक्षा रुग्णांच्या शरीरातील, रसायनांच्या क्रियाप्रक्रियांवर आता अधिकाधिक भर दिला जात आहे. मनोवैद्यक जडाकडे वळत आहे तर वैद्यक नेमक्या उलट्या दिशेकडे. विज्ञानाच्या वेगवेगळ्या शाखांतील वाटचालींचा अर्थ समजून घेणे महत्त्वाचे आहे.
 सुप्त भूतकाळ
 मिल्टन एरिक्सन यांच्या एका स्त्री रुग्णास संत्र्याचा रस अतोनात आवडे. मध्यंतरी काही कारणाने तिला त्याच रसाचा उबग आला. इतका, की बाजारात दुकानात संत्री पाहिली तरी तिला ओकारी येई. संमोहनविद्येने एरिक्सनने तिला जुन्या काळात नेले. वीस मिनिटांनंतर तिचा संत्र्याविषयीचा तिटकारा नाहीसा झाला, तिला रस पुन्हा आवडू लागला. रोगाचा उपचार कोणा औषधाने झाला नाही, भूतकाळ पुन्हा एकदा जिवंत करण्याच्या काही तंत्रामुळे झाला.
 गर्भकाळाच्या आठवणी
 डॉ. केनेथ पार्कर एक अफलातून प्रयोग करतात. त्यांच्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यांसमोर पडद्यावर केवळ चार सहस्त्रांश सेकंद एवढा वेळ एक तेजस्वी प्रकाशबिंदू दाखवतात. या बिंदूवर काही संदेश कोरलेला असतो; पण नेहमीच्या पद्धतीने तो वाचणे एवढ्या थोड्या वेळात शक्य नसते. तरीही या सुप्त संदेशाचा 'आई' या कल्पनेचा काहीही उल्लेख असला तरी त्याचा परिणाम मोठा शुभंकर होतो. 'वंदे मातरम्' आणि 'मातृभक्ती' यांचा शरीरातील सुप्त शक्तींवर काही विशेष चांगला परिणाम आहे, असा डॉ. पार्कर यांचा निष्कर्ष आहे.
 सुप्तावस्थेतही मनुष्याची काही इंद्रिये जागृत असतात, असा शास्त्रज्ञांचा अनुभव आहे. शस्त्रक्रियेच्या वेळी गुंगीत असलेली एक बाई शस्त्रक्रियेनंतर ठार वेडी झाली. ती गुंगीत असताना डॉक्टरांनी तिच्या लठ्ठपणाबद्दल काही बीभत्स विनोद केला होता, त्याचा आणि तिच्या वेडाचा संबंध होता असे सिद्ध झाले.
 सुप्त स्मृतींचा वापर
 या सुप्त संदेशांचा प्रभाव आता सर्वमान्य झाला आहे. एवढेच नव्हे, तर आपल्या मालाचा खप वाढविण्यासाठी कारखानदार सुप्त संदेशांचा उपयोग व्यापारी हेतूने करून घेत आहेत. १९९० मध्ये 'पेप्सी' कंपनीने त्यांच्या मालाच्या वेष्टनांवर सुप्त संदेश दिल्याचे 'टाईम' या जगविख्यात साप्ताहिकाने उघडकीस

अन्वयार्थ - एक / १७