पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/23

हे पान प्रमाणित केलेले आहे.

 सीता अजून वनवासी
 हनुमानाच्या मंदिराची काही डागडुजी चालू आहे. सीतेचा वनवास मात्र आजही संपलेला नाही. सीतेच्या मंदिराच्या आसपास घाण माजली आहे. गावची हागंदारी तिथे आहे.
 रामाच्या नावाने हजारो मंदिरे आहेत. सीता मात्र अभागिनी, वनवासी, आजही निराधार आहे. पुरुषोत्तम रामाच्या आणखी एका मंदिराचे नवे 'कांड' घडते आहे; घोषणांच्या निनादात मस्जिद त्यासाठी पाडण्यात आली. रामाचे भक्त घोषणा देत आहेत, "सियावर रामचंद्र की जय!"

(७ जानेवारी १९९३)
■ ■

अन्वयार्थ - एक / २४