पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/241

हे पान प्रमाणित केलेले आहे.






स्वामी, जॉर्ज, मेधा, क्लिंटन आणि डंकेल


 या आठवड्यात डंकेल विरोधकांच्या मोर्चांनी, निदर्शनांनी देश नाहीतरी वर्तमानपत्रे चांगली गाजवली. ४ एप्रिलच्या मुंबईतील निदर्शनांस व्यासपीठावर जॉर्ज फर्नांडिस, विश्वनाथ प्रताप सिंग, लालूप्रसाद यादव अशा थोरामोठ्यांची हजेरी होती. मोर्चेकरी चारपाच हजारही नव्हते, तरी प्रत्येक पेपरात पहिल्या पानावर फोटोसकट बातमी झळकली.
 ५ एप्रिलला दिल्लीत डाव्यांचा मोर्चा झाला. जमलेली संख्या सन्माननीय होती. काहीतरी धुडगूस घातल्याखेरीज 'बातमी' बनत नाही हे लालभाईंना पक्के ठाऊक असल्याने त्यांनी संसदेकडे जाण्याचा आग्रह धरला. बंदीविरुद्ध सत्याग्रह करून अटक करून घेणे असा कार्यक्रम मुळातच नव्हता. साहजिकच पोलिसांशी लढत झाली. लाठी चालली, अश्रूधुराची नळकांडी फुटली, पोलादाची पाती लावलेले बाण निदर्शकांनी पोलिसांवर सोडले, मोर्चा, 'सफल संपूर्ण' झाला. अगदी बी.बी.सी.वरसुद्धा चित्रणासहित बातमी आली.
 अटलजींची चपळाई

 ६ एप्रिल म्हणजे दुसऱ्याच दिवशी भाजपाची सभा रामलीला मैदानावर झाली. मंदिरवाद सोडून अर्थवादाकडे आपण वळतो आहोत, हे जगाला दाखवण्याचा भाजपाचा प्रयत्न; पण समोर बसलेल्या केशरी फौजेचा श्रीरामाचा जयजयकार इतका मोठा होता, की त्याची दखल घेऊन राम मंदिराविषयी बोलणे अटलजींनासुद्धा भाग पडले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 'स्वदेशी' वादामुळे भाजपा चांगलाच अडचणीत आला आहे. मध्यावधी निवडणुकांचे निकाल फारसे समाधानकारक नसले तरी केंद्रात सत्तेवर येण्याचे त्यांचे मनसुबे अजून जिवंत आहेत. खुर्चीवर आलो तर गॅट करारात सामील होण्याखेरीज गत्यंतर नाही हे त्यांना पक्के उमजले आहे; तरीही डंकेल करारामुळे शेतकरी

अन्वयार्थ - एक / २४२