पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/305

हे पान प्रमाणित केलेले आहे.

काम करीत. आपल्याकडे गाव पंचायत, जातिपंचायत यांच्याकडे ही जबाबदारी होती; पण त्याही संस्था मोडून गेल्या आणि सारी काहीच सत्ता सरकारच्या तेवढी हाती आली.
 'खटिया गाणी' सांस्कृतिक नैतिक अधःपाताचे लक्षण आहेत किंवा नाहीत याबद्दल वेगवेगळी मते असू शकतील; पण काही उपायोजना करायची असेल तर ती कुटुंबात झाली पाहिजे. सामाजिक संस्थांमार्फत झाली पाहिजे. या कारणानेदेखील बुडत्या सरकारला अवसान सापडता कामा नये. म्हातारीच्या मरणाच्या दुःखापेक्षा काळ सोकावण्याचा धोका जास्त मोठा आहे.

(१९ ऑगस्ट १९९४)
■ ■

अन्वयार्थ - एक / ३०६