पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/324

हे पान प्रमाणित केलेले आहे.

 न शापात् न शरात्
 महाराष्ट्रात जो कोणी लेखक म्हणून, कवी म्हणून कलाकार म्हणून, अगदी शास्त्रज्ञ म्हणूनसुद्धा पुढे येईल त्याला सरकारी तबेल्यात आणून बांधण्याची आणि चंदीवर खुश ठेवण्याची मोठी हुशार योजना आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या काळात डफाच्या थापेची धास्ती घेतलेल्या सुलतानांनी साऱ्या शाहिरांना भाट बनवून टाकले. आता भीमथडीची तट्टे नाहीत, मराठी तलवारीचे पाणी नाही आणि नुसत्या ठाणठाण आवाजाने रक्त सळसळणारी डफावरची थापही नाही. सुलतानांना आता कशाची चिंता म्हणून राहिलेली नाही.

(२९ सप्टेंबर १९९४)
■ ■

अन्वयार्थ - एक / ३२५