पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/92

हे पान प्रमाणित केलेले आहे.

कोणी सांगावे, न्यायालय कदाचित्, केंद्रीय सेवा आयोगाचा निर्णय बाजूला सारून त्याला सेवेत घेण्यात यावे, असा आदेश देईलही. मानवता मानवता म्हणून जे काय म्हणतात त्या दृष्टीने वेगवेगळया पद्धतीने गळबटांची भरती करणे उचित असेलही. प्रश्न शिल्लक राहतो तो एकच. पु. ल. देशपांडेंच्या बेंबट्यांनी टपालसेवा कार्यक्षम राखली, एक उज्ज्वल परंपरा तयार केली. करुणेपोटी भरती झालेले गळबट ही परंपरा राखू शकले नाहीत, तर आर. के. लक्ष्मण यांच्या 'सामान्य माणसा'ला न्याय देणारी काही मानवतेची फूटपट्टी त्याच्या हाती कोणी देईल काय?

दि. २३/८/२०००
■ ■

अन्वयार्थ – दोन / ९४