पान:अभिनवकाव्यमाला भाग दुसरा.pdf/४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना. प्रसिद्ध साहित्यपंडित व महाराष्ट्र कवि रा. रा. लक्ष्मणशास्त्री लेले यांनी "शारदाप्रसादनमडंला'च्या वतीने अभिनवकाव्यमालेचा पहिला भाग प्रसिद्ध केल्याला उणी पुरी पांच वर्षे झाली. इतक्या अवकाशांत या मालेचे आणखी निदान दोनतरी भाग प्रसिद्ध झाले असते. पण ते झाले नाहीत याला कारण आम्ही आहों. 'शारदाप्रसादनमंडला 'नें मालेचा दुसरा भाग तयार करून छापण्याचे काम आम्हांकडे सोपविलें, व आम्हीं ते मोठया उत्साहानें पतकरिलें; पण पुढे एकामागून एक अपरिहार्य संकरें येऊन तें जें एकदां लांबणीवर पडलें तें पडलें; तें आज शेवटी आमच्या एका कविमित्राच्या साहाय्यानें पुरे होऊन जगापुढे येत आहे. या अक्षम्य विलंबामुळे 'शारदा- प्रसादनमंडला'च्या कार्याची जी पिछेहाट झाली आहे, आमच्या कविमित्रांना व त्यांच्या काव्यांचा आस्वाद घेण्याकरितां सदा आतुर राहणान्या रसिकांना जो त्रास झाला आहे, त्याबद्दल आम्ही जबाबदार असून ते म्हणतील त्या दंडास पात्र आहों. आणि त्यांनीहि आपल्या शीलास अनुसरून आम्हांला असा चमत्कारिक दंड केला आहे, कीं, त्याच्या वेदना आम्हांला आमरण सोसाव्या लागणार आहेत. हा दंड म्हणजे यांतल्या एकानेंहि आम्हाला एका शब्दानें न दुखविणें ! हैं यांचें मौनव्रत, विश्वास, सहनशीलता आणि सहानुभूति यांचें पूर्ण द्योतक आहे, व याच्या योगानें यांनी आम्हाला दंड करण्याच्या ऐवजी एक अप्रतिम देणगी घ्यायला लावून निरंतर खालीं पाहावयाला लाविलें आहे. असो; इतक्या उशिरानें कां होईना, हें पुस्तक तयार झालें म्हणून सकल सिद्धिदात्या परमेश्वराचे उपकार मानून आम्ही हें रसिकांच्या चरणी अर्पण कंरितों. हें तयार करणार, अर्वाचीनांचा भयंकर द्वेष म्हणजे प्राचीनांविषयीं अमर्याद प्रेम, असें समजणारा नाहीं. येथूनतेथून साया आधुनिक कवींना एकदम अडाणी म्हणून, मग नानाप्रकारच्या लटपटी करून आपलें म्हणणें खरें ठरविणारांकडे याचें लक्ष्य बिलकूल नाहीं; भिन्न भिन्न कालों व भिन्न भिन्न परिस्थितीत झालेल्या कवींची तुलना करून एकाला उत्तम आणि एकाला अधम