पान:अभिनवकाव्यमाला भाग दुसरा.pdf/६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३ हे पुस्तक इतक्या लांबणीवर पडण्याचे कारण मध्यन्तरीं उपस्थित झालेल्या अनेक अडचणी व घोटाळे होत, हें आरंभीच सांगितलें आहे. या पुस्तकांत आलेल्या कवींना त्यांच्या त्यांच्या वयोमानाप्रमाणे स्थळ मिळणेंहि अशक्य झाले, हा तरी या अडचणींचा व घोटाळ्यांचाच एक विचित्र परिणाम आहे. आणि याबद्दल वाचकांनी आम्हांला क्षमा करावी इतकेच लिहिणे तूर्त आमच्या हात आहे. हे पुस्तक छापून प्रसिद्ध करण्याच्या कामी ' मनोरंजन ' छापखा न्याच्या मालकांनी आम्हाला जी मदत केली आहे, तीबद्दल आम्ही त्यांचे अत्यंत ऋणी आहों. हा छापखाना रा. मित्रांचा म्हणजे महाराष्ट्रांतील लेखक- वर्गाच्या मित्रांचा आहे, इतकेच सांगितले म्हणजे म्हणजे पुरे. दुसरी आवृत्ति. ना. वा. टिळक. आमचे मित्र रे० टिळक हे ही दुसरी आवृत्ति पहावयास राहिले नाहीत याचें फार वाईट वाटते. त्यांना इष्ट अशा एक दोन गोष्टी हिच्यांत साधल्या आहेत. त्या वाचकांच्या सहज लक्ष्यांत येण्यासारख्या आहेत. या भागाशी कवि या नात्यानें ऋणानुबंधी असलेले लेंभे, लोंढे, ठोमरे, गोविंदाग्रज, रेंदाळ- कर, चिंतामणी हे दिवंगत झाले, यामुळे मालेची पराकाष्ठेची हानि झाली आहे, पण ईशेच्छेपुढे कोणाचाच उपाय नाहीं हें ध्यानांत ठेवून माला गुंफ- ण्याचा क्रम चालू ठेवण्याची मंडळाची इच्छा आहे. ती पूर्ण करणे कवीं- कढे आहे. चैत्र वद्य १२ शके १८४४. } कक्ष्मणशास्त्री लेले. चिटणीस, शा. प्र. मं., पुणे.