या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

घटक -१: सुतारकामाची ओळख व कार्यशाळेतील सुरक्षितता : उद्दिष्टे: (१) सुतारकामाची ओळख (२) कार्यशाळेतील सुरक्षितता उपघटक १.१: सुतारकामाची ओळख प्रस्तावना : आजच्या यांत्रिक युगात सुतारकामाचे विशेष महत्त्व आहे. कारण सुतारकामाचा कारागीर समाजाच्या तसेच कारखान्याच्या गरजा भागवत असतो. उदा. समाजाला पुष्कळ त-हेच्या लाकडी वस्तुंची गरज असते. कार्यालय, दुकान व घरांमध्ये वापरण्यात येणाऱ्या फर्निचरसाठी लाकडाचा उपयोग होतो. तसेच बांधकामाकरिता लाकडाचा उपयोग होतो. अशा या लाकडावर काम करणाऱ्या कारागिरास सुतार म्हणून संबोधतात. कोणत्या प्रकारची कामे या व्यवसायात केली जातात, कोणकोणती हत्यारे व यंत्रे या कामासाठी वापरली जातात, तसेच कोणकोणत्या प्रकारचे लाकूड या कामासाठी वापरले जाते याची माहिती या व्यवसायाचे शिक्षण देताना द्यावी लागते. त्यासाठी सुतारकामाची कार्यशाळा असणे आवश्यक आहे. उपघटक १.२ : कार्यशाळेतील सुरक्षितता प्रस्तावना : कार्यशाळेत काम करताना जसे कामाला महत्त्व असते तसेच सुरक्षेलादेखील असते. काम करताना आपण अनेक प्रकारची हत्यारे व यंत्रे वापरतो. ही हत्यारे व यंत्रे वापरताना कोणत्याही प्रकारची इजा अथवा धोका होणार नाही, याची दक्षता घ्यावी. सुरक्षेचा संबंध दोन गोष्टींशी प्रामुख्याने येतो - (१) सामान्य ज्ञान (२) चांगले निर्णय. सुरक्षेविषयीचे नियम खालीलप्रमाणे: (१) कार्यशाळेत काम करताना अतिसैल कपडे वापरू नयेत. (२) पायात चप्पल किंवा बूट घालावेत. (३) यंत्रे चालू करण्यापूर्वी त्याची पूर्ण माहिती करून घ्यावी. (४) कापणाऱ्या भागापासून सुरक्षित अंतर पाळावे. (५) यंत्रावर काम करताना माकडचाळे करू नयेत. (६) नेहमी हत्यारे धारदार वापरा, (७) हॅमर, मॅलेटसारख्या हत्यारांच्या मुठीला तेल/ग्रीस लागू देऊ नये. (८) प्लेनिंग मशीनवर तसेच सॉ मशीनवर काम करताना गॉगल वापरावा, मूल्यमापन : (१)सुरक्षेचा संबंध कोणत्या गोष्टीशी येतो? घटक -२ : सुतारकामात वापरण्यात येणारी हत्यारे उद्दिष्टे : (१) तोडणारी हत्यारे (Pairing Tools) (२) कापणारी हत्यारे (Sawing Tools) (३) रंधणारी हत्यारे (Plainning Tools) (४) छिद्र पाडणारी हत्यारे (Boaring Tools) (५) ठोकणारी हत्यारी (Striking Tools) उपघटक २.१ : तोडणारी हत्यारी (Pairing Tools) प्रस्तावना : पटाशी (Chisel) : लाकडावर तासकाम करण्यासाठी म्हणजे लाकूड छिलून साफ करण्यासाठी पटाशीचा वापर करतात. पटाशी उच्च कार्बन पोलादापासून (High Carbon Steel) तयार केलेली असते. लाकडाचे तोडकाम करण्यासाठी याचा उपयोग होतो. पटाशीचे विविध प्रकार खालीलप्रमाणे आहेत: १. स्थिर पटाशी (Firmer Chisel) : रंधाकामापूर्वी लाकडाचा जादा भाग तासण्यासाठी व लाकडावर खाचा तयार करण्यासाठी या पटाशीचा उपयोग होतो. हिचा मूठ (Handle) आकार म्हणजे पात्याची रुंदी होय.या पटाशी ३ मि.मी. ते ३५ मि.मी. आकारामध्ये उपलब्ध आहेत. १७