या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मूल्यमापन ः (१) सुतारकामात ठोकण्यासाठी लागणारी हत्यारे सांगा. (२) मोगर (मॅलेट) चा उपयोग लिहा. (३) हातोड्याची निगा व काळजी कशी घ्याल? घटक ३ : सुतारकामात वापरण्यात येणारी साधने उद्दिष्टे : (१) मापणारी साधने (२) आखणारी साधने (३) पकडणारी व इतर साधने उपघटक ३.१ : मापणारी साधने प्रस्तावना : सुतारकामात काम करताना मापे घ्यावी लागतात. आवश्यक साधने: (अ) चौघडी मोजपट्टी (Four Fold Footrule) (ब) कैवार (Calliper) (क) पोलादी मोजपट्टी (Steel rule) (अ) चौघडी मोजपट्टी (Four Fold Footrule) : ही पूर्णपणे लाकडी बनावटीची असते. चार घड्या होत असल्यामुळे त्याला फोर फोल्ड (Four Fold) मोजपट्टी असे म्हणतात. सुतारकामात लाकडांवर आखणी करताना मोजमापासाठी याचा उपयोग करतात. (ब) कैवार (Calliper) : कैवारच्या उपयोगानुसार त्याचे खालील तीन प्रकार आहेत. (१) आंतर कैवार (Inside Calliper) : आंतरमापे घेण्यासाठी आंतर कैवार | बाह्य कैवार उपयोगात येणाऱ्या कैवारास आंतर कैवार असे म्हणतात. याच्या पायाची दोन्ही टोके बाहेरच्या दिशेने वाकलेली असतात. (२) बाह्य कैवार (Outside Calliper) : बाह्य मापे घेण्यासाठी उपयोगात येणाऱ्या कैवारास बाह्य कैवार असे म्हणतात. याच्या पायाची दोन्ही टोके वर्तुळाकार आकारात बाजूने वाकलेली असतात. (३) लंगडा कैवार (Odd leg Calliper) : याच्या दोन्ही पायाचा आकार वेगवेगळा असतो. याच्या एका पायाचे टोक आतील बाजूस वळलेले लंगडा कैवार असून दुसरे टोक टोकदार असते. (क) पोलादी मोजपट्टी : (Steel rule) : पोलादी मोजपट्टी हे रेखीय मापनासाठी वापरण्यात येणारे मापनाचे प्रमाणित साधन होय. याद्वारे प्रत्यक्ष पद्धतीने मापन करता येते. ही मोजपट्टी पोलादापासून बनवलेली असते. याच्या एका कडेवर मि.मी.मध्ये व दुसऱ्या कडेवर इंचाच्या खूणा असतात. IT INCH 2-54 G.M. मूल्यमापन : (१) कैवारचे प्रकार सांगा. (२) चौघडी मोजपट्टीची माहिती सांगा. उपघटक ३.२ : आखणारी साधने प्रस्तावना : आखणी कामाची साधने : गुण्या (Try Square) , मार्किंग गेज, बडी (Bevel Square) , स्क्रायबर (Scriber), मॉर्टीस (Mortise Gauge) इ. २२