या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

काट्याच्या दिशेने फिरवून पहिला कट घ्या. (५) पाईप डाय घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने थोडी मागे घ्या व कट वाढवून डायने आटे पाडून पूर्ण करा. (६) कपलिंगच्या साहाय्याने आटे झाल्याचे तपासून पहा. (ब) पाईप जोडणे : (१) पाईप जोडणी करण्यास आवश्यक तितके पाईपचे पीस डायने आटे पाडून तयार करा. (२) कपलिंगच्या आतील आट्यावर दोन पाईपचे पीस बसवून पाईप रेचने फिरवून घट्ट करा. (३) याचप्रमाणे अनुक्रमे एल्बो, टी बेंड, युनियन क्रॉस यामध्ये पाईपचे पीस बसते करून पाईप रेंचने फिरवून आटे घट्ट करा. (४) याप्रमाणे पाईपची जोडणी पूर्ण करा. दक्षता व काळजी : (१) डाय पाईपशी काटकोनात राहील, याची खात्री करा. डाय उलटसुलट फिरवा. (३) डाईंग करताना ऑईलचा वापर करा. (४) डाईंग करताना डायला झटके देऊन फिरवू नका. (५) डाय साफ करून ठेवा. (६) प्रमाणापेक्षा जास्त आटे कट करू नका. (७) पाईपच्या आट्यावर व्हाईट पेस्ट लावून ज्यूट गुंडाळून नंतरच जोडणी करा. (८) पाईप उपांगे लूज राहणार नाहीत, याची काळजी घ्या. कृती : (१) नळकामात वापरल्या जाणाऱ्या साधनांची व हत्यारांची माहिती घ्या. (२) पाईप व्हाईसमध्ये घट्ट पकडा. (३) हॅक सॉने दिलेल्या मापात पाईप कापून घ्या. (४) डायपीस डायस्टॉकमध्ये योग्य प्रकारे बसवा. (५) पाईपवर पाईप डाय बसवून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरवा. घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने पाईप डाय पुन्हा मागे घ्या. ही क्रिया ठरलेल्या लांबीचे आटे पूर्ण होईपर्यंत पुन्हा पुन्हा करा. (८) आट्याची खोली वाढविण्यासाठी अॅडजेस्टिंग स्क्रू फिरवून घ्या. (९) परत वरीलप्रमाणे पाईप डाय उलटसुलट दिशेत फिरवा. (१०) सॉकेटच्या मदतीने आटे पूर्ण झाल्याचे तपासून पहा. (११) पाईपच्या आट्यांवर हबक लावून त्यावर ज्यूट गुंडाळा. (१२) त्यावर आवश्यक ते उपांग बसवून पाईप रेंचने फिरवून पक्के करा. दक्षता व काळजी : (१) पाईप कापताना उपांगामध्ये किती पाईप जाणार आहे ? उपांगामुळे किती लांबी वाढणार आहे, याचा अंदाज घेऊन पाईप कापा. (२) डायपीस डायस्टॉकमध्ये बसवताना बोथट आटे आतील बाजूस येतील, याची काळजी घ्या. (३) आटे पाडत असताना डाय पाईपला काटकोनात राहील, याची काळजी घ्या. (४) आटे पाडत असताना डायला झटके देऊ नका. (५) आटे पाडत असताना मधूनमधून ऑईल सोडा. (६) आट्याची खोली प्रमाणापेक्षा जास्त वाढवू नका. (७) काम झाल्यावर डाय साफ करून ठेवा. (८) उपांगे बसवताना ज्यूट किंवा टेफलॉन गुंडाळण्यास विसरू नका. (९) उपांगे घट्ट आवळा. शिक्षक कृती: पुढील गोष्टी विद्यार्थ्यांना समजावून सांगा. (१) नळकामात वापरल्या जाणाऱ्या साधनांचा व हत्यारांचा उपयोग कोठे व कसा करतात? (२) हत्यारे वापरताना कोणती काळजी घ्यावी? (३) पाईप कापताना उपांगाची लांबी विचारात का घ्यावी लागते? (४) आटे कसे पाडतात, ते शिकवा. (५) पाईपला किती लांबीपर्यंत आटे पाडायचे, हे कसे ठरवणार ते शिकवा, (६) उपांगाची जोडणी कशी करावी?