या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आकृती: टॅप (TAP) : यंत्र भाग जुळविताना अनेक वेळा नट, बोल्ट, स्क्रू वापरावे लागतात. नटाच्या आतील भागात व बोल्ट आणि स्क्रू वर उंचवट्याचा जो अखंड कातलेला आकार असतो, त्यास आटे (Thread) असे म्हणतात. कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात निर्मिती करताना यंत्राच्या साहाय्याने आटे पाडतात, पण कार्यशाळेत दुरुस्तीकरिता किंवा जॉब (यंत्रभाग) तयार करताना मनुष्यबळाच्या साहाय्याने आटे पाडतात. ते 'V' आकाराचे असतात. त्याकरिता टॅप व डायचा वापर केला जातो. हे एक कातनारे (कर्तन) हत्यार होय. (१) निसूत्रक (Tap) (२) बहिस॒त्रक (Die) (१) टॅप : टॅप (निसुत्रक) हे एक आतील भागात आटे पाडणारे कर्तन हत्यार होय. टॅप उच्च कार्बन पोलादापासून बनविलेला असतो. त्यावर कठीणीकरण (Hardening) व सौम्यीकरण (Temparing) केलेले असते. टॅप नेहमी तीनच्या सेटमध्ये मिळतो. पहिला टॅपला फर्स्ट टेपर टॅप असे म्हणतात. दुसऱ्याला सेकंड किंवा मिडल असे म्हणतात. तिसऱ्या टॅपला थर्ड किंवा प्लग वा बॉटमिंग टॅप असे म्हणतात. प्रथम किंवा फर्स्ट टॅपच्या टोकांचे आटे आतील बाजूला निमुळते होत गेलेले असतात, त्यामुळे तो छिद्रात सहज पकड घेतो. आटे पाडताना सर्वप्रथम याचा उपयोग करतात. सेकंड टॅपच्या टोकाचे आटे वरील बाजूस ३३