या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३) प्लॅट पट्टीचे वजन काढणे : उदा. ५omm.xyommx१००0mm प्लॅटचे वजन काढणे. (रुंदी=५omm, जाडी = 4mm, लांबी= १०००m) पट्टीचे घनफळ = ५०४५x १००० = २५०००mm' =२५०Cm' १omm= १cm वजन = _२५० Cm' == १९६५ gm = १.९६५Kgm. सूत्र = वजन = घनफळ x घनता ७.८५gm/Cm' तयार जॉबचे कॉस्टींग काढणे - उदा. टेबल, स्टूल, ग्रिल, दरवाजा इ.चे कॉस्टिंग काढणे, संदर्भ : १) विद्युत अभियांत्रिकी व इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाची मूलतत्त्वे (V-3), पान नं.१५१-१५७. दिवस : दुसरा प्रात्यक्षिकाचे नाव : वेल्डींग – रनवेल्डींग उपक्रमाची/जॉबची निवड : खालील पैकी गटात काम करताना एका जॉबची निवड करावी. (१) तिवई तयार करणे. (२) गॅस ट्रॉली स्टँड तयार करणे. (३) टेबल, खुर्ची, कॉट, रॅक, व्हील बॅरो, ट्रॉली इ. निदेशक पूर्वतयारी : (१) जॉबची निवड झाल्यानंतर जॉबचे मटेरिअल एकत्र आणून ठेवावे. (२) वेल्डींगची साधने - वेल्डींग मशीन, अँगल, इलेक्ट्रिक होल्डर, वेल्डींग केबल, स्टील टेप, अर्थिग कॅप इ. व्यवस्थित आहेत ना ते पहावे. (३) जॉबचे ड्रॉईंग काढलेले असावे. त्यानुसार प्रात्यक्षिक करताना मटेरिअल कटींग करता येईल. अपेक्षित कौशल्ये : (१) अँगल किंवा रॉड तोडणे. (२) अँगल किंवा रॉड सरळ करणे. (३) रनवेल्डींग करणे. (४) टॅकिंग करणे. (५) सुरक्षिततेची साधने वापरून काम करता येणे. सुरक्षिततेचे नियमः (१)वेल्डींग मशीन चालविण्याची माहिती असल्याशिवाय मशीन वापरू नये, (२) इलेक्ट्रीक सेक्शन मधून कनेक्शन चेक करून मशीन जोडणे. (३) विभागात काम करताना बुट, हँड ग्लोव्हज, हँडस्क्रिन हे सेफ्टीसाठी वापरावे. (४) वेल्डींग करताना वेल्डींग डिपॉझिट चिपिंग हॅमर वापरून काढावा. (५) ग्राईंडींग गाँगलचा चिपिंग करतांना उपयोग करावा. (६) जॉब साईजवर आधारित ३०-३५v व ६०२००० करंट वापरावा. शिक्षक कृती: (१) विद्यार्थ्यांची ३ गटात विभागणी करावी. (२) एका गटाला जॉबसाठीचे मटेरिअल कटींग करण्यास सांगावे. (३) एका गटाला वेल्डींग मशिनची जोडणी समजावून सांगावी व वेल्डींग करून दाखवावे. (४) एका गटाला जॉबच्या ड्रॉईंगनुसार कॉस्टींग करण्यास सांगा. नंतर त्या गटास जॉब चांगला फिनीश करण्यास सांगा. (५) तयार जॉबला रंग देवून - जॉब फायनल करावा. विशेष माहिती: (१) वेल्डींग रॉड होल्डरला लावल्यानंतर तो बेंड करू नये, (२) अर्थिंग व होल्डर एकमेकांना जोडू नये, जेव्हा मशीन चालू असेल तेव्हाच जोडावे. (३) मशिन चालू असताना करंट बदलू नये. (४) वेल्डिंग करताना स्क्रिनचा उपयोग करावा. सुरुवातीला स्ट्राईक वेल्डींग करावे व नंतर रन वेल्डींग करावे, जॉब गरम असताना चिपिंग करू नये. (७) ब्रशच्या साहाय्याने जॉब क्लिन करावा. ४३