या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पॉलिश करायचे असेल तो रंग, पाणी, स्पिरिट, तेल यांचे मिश्रण पृष्ठभागावर लावावे. पाण्यात मिसळलेला रंग लाकडात जिरून सारखी छटा दिसते. हा रंग पूर्णपणे वाळल्यानंतरच पॉलिशकाम करावे. त्याकरिता स्वच्छ कपड्याचा बोळा घेऊन पॉलिश पृष्ठभागावर लावावे. पृष्ठभागावरील सळ चांगले वर येईपर्यंत पॉलिश करावे. नंतर पॉलिश पूर्ण वाळू द्यावे. वाळल्यानंतर घासकागदाने पृष्ठभाग आणखी घासावा. पृष्ठभागावरील घासकामाचा भुसा पुसून टाकवा आणि पूर्वीप्रमाणे कापडाचा बोळा करून पॉलिशचा दुसरा हात लावावा व पॉलिश पूर्ण वाळू द्यावे. त्यानंतर वरील प्रमाणेच पॉलिशचा तिसरा हात लावावा. पॉलिश चकचकीत व सुंदर दिसेल. (२) पेंटींग (Painting) : तेलमिश्रीत रंगाला इंग्रजीत OilPaint असे म्हणतात. हे रंगकाम दोन प्रकारांनी करता येते. ब्रशने आणि स्प्रेने. या पेंटींगमुळे वस्तुचा मूळ रंग बदलतो व वस्तुस पेंटचा रंग प्राप्त होतो. घरातील दरवाजे व खिडक्या यांना पेंटींग करतात, ज्यामुळे वातावरणातील आर्द्रतेचा त्यावर परिणाम होत नाही व त्याचा वाळवी किंवा बुरशी लागण्यापासून बचाव होतो.. (३) वार्निशिंग (Varsishing) : वार्निशिंग केल्याने लाकडी वस्तुवर हवेचा परिणाम होत नाही. याचे मिश्रण बाजारात तयार मिळते. लाकूड घासकागदाने घासल्यानंतर ब्रशच्या साहाय्याने वार्निशचा पहिला हात सळासमान द्यावा व पूर्ण वाळू द्यावे. दुसरा हात सळाशी आडवा द्यावा, जरुरी वाटली तर तिसरा हात द्यावा. मूल्यमापन :(१) लाकडाचे संरक्षण कशासाठी करतात? (२) लाकडाच्या संरक्षणाच्या पद्धती सांगून संरक्षकाची नावे सांगा. (३) लाकडाला पॉलिश कसे करतात ते सांगा. (४) लाकडाच्या गुणधर्मावरून पडणारे प्रकार सांगा. (५) कोणत्याही चार लाकडांची नावे सांगून त्यांचे गुणधर्म व उपयोग सांगा. (६) साग लाकडाचा उपयोग काय? उपघटक : कृत्रिम लाकूड प्रस्तावना: हल्ली सागवान तसेच अन्य लाकडाला पर्याय म्हणून कृत्रिम लाकडाचा वापर फार मोठ्या प्रमाणात केला जातो. या लाकडांचा इमारत बांधकामात तसेच फर्निचर कामात जास्तीत जास्त वापर केला जातो. कृत्रिम लाकडाचे फायदे :(१) या लाकडात नैसर्गिक लाकडातील दोष आढळत नाही. (२) ही लाकडे मोठ्या आकाराची तक्त्यात उपलब्ध असतात. (३) हे लाकूड मजबूत व आकर्षक असतात. (४) ही लाकडे आवश्यक मापात व कल्पक आकारात कापता येतात. (५) वस्तू तयार करताना वेळेची व पैशाची बचत होते. (६) या लाकडात स्क्रू किंवा खिळे ठोकले असता भेगा पडत नाही. कृत्रिम लाकडाचे प्रकार:- १) प्लायवूड २) पार्टिकल बोर्ड ३) ब्लॉक बोर्ड ४) लॅमिनेटेड बोर्ड (१) प्लायवूड : प्लाय म्हणजे थर होय. लाकडी ओंडक्यापासून पातळ फळ्या (vaneer) तयार करून त्याचे उभे व आडवे थर एकमेकांना जोडून प्लायवूड तयार करतात. या पातळ फळ्यांचे सळ एकमेकांना काटकोनात ठेवून सरस किंवा गोंद वापरून दाब यंत्रात दाब देऊन एकमेकांना जोडतात व तयार तक्ते योग्य आकारात कापून प्लायवूड तयार होते. प्लायवूड तयार करताना पातळ फळ्या विषम संख्येत (जसे ३,५,७,९) एकमेकांना जोडतात. प्लायवूडचा प्रमाणित आकार २४४० x १२२० मि.मी. इतका असतो. हे ३ ते २४ मि.मी. मध्ये विविध जाडीत जसे (३ मि.मी., ६ मि.मी., १५ मि.मी., १८ मि.मी., २४ मि.मी.) उपलब्ध असतात. (२) पार्टिकल बोर्ड : लाकडाचे बारीक कण तयार करून ते अत्यंत उष्ण अशा वाफेत शिजवतात व लगदा तयार करतात. या लगद्यात सरस किंवा रेझिनसारखा चिकट पदार्थ ठराविक प्रमाणात मिसळण्यात येतो. या चिकट ५२