या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लगद्यावर यंत्राच्या साहाय्याने पुष्कळ दाब देऊन त्याचे तक्ते तयार करतात. या तक्त्यांना हवे ते आकार दिल्यानंतर ते वाळवतात. या तक्त्यांची जाडी व टेक्श्चर जरुरीप्रमाणे विविध प्रकारचे मिळू शकते. (३) ब्लॉक बोर्ड : चौरस लाकडी पट्टया एकमेकांना जोडून त्याच्या पृष्ठभागावर दोन्ही बाजूने पातळ फळ्या चिकटवतात व ब्लॉक बोर्ड तयार करतात. (४) लॅमिनेटेड बोर्ड : हे कृत्रिम लाकूड बोर्ड सारखेच तयार करतात. फक्त यात वापरण्यात येणाऱ्या लाकडी पटटया या आयताकृती असतात. संदर्भ : शिक्षक हस्तपुस्तिका, इयत्ता ९ वी (V1), पान नं.१४० ते १४३. दिवस : पाचवा प्रात्यक्षिक : सुतारकाम -बिजागरी बसविणे. प्रस्तावना : सुतारकामामध्ये विविध प्रकारच्या लाकडी वस्तू बनविल्या जातात. (उदा. लाकडी पेटी, दरवाजे) या लाकडी वस्तूंची उघडझाप सहज शक्य होण्यासाठी त्यांना बिजागरी बसविणे आवश्यक असते. यासाठी आपण बिजागरी बसविणे या कौशल्याचा अभ्यास करू. त्याचबरोबर त्याचे प्रकार समजून घेऊ. बिजागरी मृदू पोलाद व पितळ या धातुंपासून तयार केलेल्या असतात. सर्वसाधारणत: कामात मृदू पोलादाच्या उत्कृष्ट मजबूत व आकर्षक कामासाठी पितळीच्या बिजागऱ्या वापरतात. निदेशकांनी करावयाची पूर्वतयारी: (१) ज्या प्रकारची बिजागरी बसवायची आहे ती बिजागरी व तिचे स्क्रू खरेदी करून ठेवा. (२) प्रात्यक्षिकासाठी लागणारी साधने व हत्यारे पुरेशी आहेत याची खात्री करा. उदा. ड्रिल मशीन, स्क्रू ड्रायव्हर नटबोल्ट, रंधा, पेन्सिल, पटाशी, ड्रीलबीट, (३) लाकडी फळी अथवा प्लायवूड उपलब्ध करून ठेवा. (४) सर्व साहित्य, साधने व हत्यारे टेबलवर मांडणी करून ठेवा. (५) गट पाडा (५ विद्यार्थ्यांचे १ असे तीन) उपक्रमांची निवड : (१) शाळेतील खिड़की व दरवाजा यांना बिजागरी बसविणे, (२) पेटीला बिजागरी बसविणे. (३) शाळा/गावातील कपाटांची झडप बिजागरीने बसवून द्या. (४) स्विचबोर्ड बिजागरीने जोडणे. (५) सोलर कुकर बिजागरीने जोडणे. (६) फोल्डिंग टेबल तयार करणे. (७) फर्निचरच्या दुकानाला भेट देऊन विविध बिजागरी बसविण्याचा अनुभव आत्मसात करणे. अपेक्षित कौशल्येः (१) स्क्रू ड्रायव्हरच्या साहाय्याने स्क्रू आवळता येणे. (२) बिजागरीचे विविध प्रकार ओळखता येणे आणि त्यांची माहिती सांगता येणे/असणे, (३) ड्रिल मशीन/हँड ड्रील मशीन हाताळता येणे. (४) बिजागरी बसविणे. (५) हत्यारांचा (पटाशी इ.) वापर करणे. शिक्षक कृती : (१) ड्रिल मशीन व पटाशी वापरतानाची दक्षता सांगा. (२) बिजागरी बसविण्यासाठी आखणी कशी करतात ते शिकवा. (३) बिजागरीच्या प्रकारांची माहिती द्या. (४) स्क्रू आवळणे व फळी कशी कट करतात ते दाखवा. ५३