या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सुतारकाम - बिजागरीचा वापर अपेक्षित कौशल्ये : (१) बिजागांची माहिती घेणे. (२) बिजागरी बसविणे. साहित्य : लाकडी फळी / प्लायवूड, बिजागिऱ्या, काऊंटरसंक स्क्रू इ. साधने : हँड ड्रील मशीन इ. कृती : (१) लाकडी फळीचा आकार पाहून बिजागरीचा आकार, संख्या व गरजेनुसार बिजागरीचा प्रकार ठरवा. (२) फळीला ज्या ठिकाणी बिजागऱ्या बसवायच्या आहेत त्या जागेवर बिजागरी ठेवून खुणा करा. (३) खुणांच्या जागेवर पटाशीने बिजागरीच्या पराच्या जाडीइतके खाचून घ्या. (४) पुन्हा त्या जागेवर बिजागरी ठेवून पेनने स्क्रूच्या छिद्रांच्या खुणा करा. (५) छिद्रांच्या खुणांवर हँड ड्रील मशीनने छिद्र पाडा. (६) पुन्हा त्या जागेवर बिजागरी ठेवून स्क्रू बसवा. दक्षता : (१) फळीवर बिजागरीची खूण करताना बिजागरीचा सांधा फळीच्या बाहेर ठेवा. (२) छिद्रांच्या खुणा करताना बिजागरी हलू देऊ नका. (३) स्क्रूच्या जाडीपेक्षा लहान छिद्र पाडा. (४) स्क्रू तिरपा बसवू नका. (५) स्क्रू ठोकूनका. (६) स्क्रू त्याच्या लांबीएवढा आत गेल्यावर जास्त फिरवू नका. (७) स्क्रूचे डोके बिजागरीच्या पट्टीच्या वर येणार नाही याची काळजी घ्या. शिक्षक कृती : (१) बिजागरी बसविण्याच्या इतर पद्धतीसुद्धा शिकवा. (२) बिजागरीच्या प्रकारांची माहिती द्या. आपणास हे माहीत आहे का ? (१) दरवाजा, खिडकी यांच्या झडपांची उघडझाप करण्यासाठी बिजागरी वापरतात. (२) बिजागऱ्या लोखंड, पितळ वा अल्युमिनियमच्या बनवतात. तसेच त्या लहानमोठ्या आकारात मिळतात. (३) उपयोगानुसार बिजागांचे टक्करी, टी, पट्टी आणि पार्लमेंट इ. वेगवेगळे प्रकार पडतात. (४) सर्वसाधारणपणे कामासाठी टक्करी बिजागरी, तर अवजड दरवाज्यासाठी टी बिजागरी वापरतात. दुकानाच्या घडीच्या दरवाजाला पट्टी बिजागरी वापरतात. बिजागरी बसविणे : दरवाजा किंवा खिडकी यांची उघड-बंद करण्यासाठी ज्या माध्यमाद्वारे भिंतीला किंवा लोखंडी पट्टीला किंवा लाकडाला बसवितो ते माध्यम – वस्तु म्हणजे बिजागिरी होय. उपयोग : या बिजागऱ्या वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. (१) मोठ-मोठे अवजड, तसेच हलक्यात हलक्या दरवाजांस बिजागरी वापरतात. (२) बिजागरीमुळे दरवाजांची, खिडक्यांची उघड-झाप सहज व सुलभतेने होते. प्रकार : (१) टक्करी बिजागरी (२) टी बिजागरी (३) पट्टी बिजागरी (४) पार्लमेंट बिजागरी बिजागांचे प्रकार : (१) टक्करी किंवा संमुख बिजागरी (बट हिंज (Butt Hinge)): संमुख बिजागरी म्हणजे एकमेकांस जाडलेल्या आयताकृती आकाराच्या दोन समान पट्ट्या होत. या बिजागरीचा उपयोग सर्वसाधारण व विशेषतः सर्वच कामात केला जातो. या बिजागऱ्या २५ मि.मी. ते १५० मि.मी. या आकारात उपलब्ध आहेत. याचा आकार म्हणजे याच्या पट्टीची लांबी होय. या बिजागरीस टक्करी बिजागरी असे सुद्धा म्हणतात. (२) उचलती संमुख बिजागरी (Rising Butt Hinges) : ही बिजागरी उघडली म्हणजे तिची एक पाकळी वर उचलली जाते म्हणून या बिजागरीला रायझिंग बट हिंज असे म्हणतात. जमिनीवर अंथरलेल्या सतरंज्या, गालिचे यासारख्या वस्तू दाराला अडून खराब होऊ नयेत म्हणून दार उचलले जावयाची सोय होण्यासाठी ही बिजागरी वापरून करता येते. ५४