या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३) टी बिजागरी (T Hinge) : ही टी (T) आकाराची बिजागरी होय. याची एक पट्टी संमुख (Butt Hinge) बिजागरीसारखी तर दुसरी पट्टी बिजागरीसारखी (Strap Hinge) असते. हिचा उपयोग अवजड दरवाज्यांच्या झडपांना जास्त लांबीपर्यंत आधार मिळावा म्हणून त्यांच्या जोडणीत वापरतात. (४) पट्टी बिजागरी (Strap Hinge) : पट्टी बिजागरी म्हणजे 'V' आकाराच्या दोन लांब पट्ट्यांपासून तयार झालेली बिजागरी होय. याचा उपयोग दुकानांचे किंवा तबेल्यांचे मोठमोठे दरवाजे यांच्यासाठी करतात. या तीन ते सोडा इंच लांबीच्या उपलब्ध आहेत. ही लांबी बिजागरीच्या एका पाकळीवरून मोजतात. (५) पार्लमेंट बिजागरी (Parliament Hinge) : बाहेरच्या बाजूला | उघडणारे दरवाजे, खिडक्या यांच्यासाठी ही बिजागरी वापरतात. या बिजागरीमुळे दारे भिंती समान राहू शकतात व त्यामुळे दारांची माणसाच्या हालचालीस कोणत्याही प्रकारे अडचण होत नाही. (६) पियानो बिजागरी (Piano Hinge): ही बिजागरी पियानोच्या झाकणाकरिता वापरतात. म्हणून यास पियानो बिजागरी म्हणतात. ही अरूंद, लांब व नाजूक असते. हिचा उपयोग भिंतीतील कपाटाच्या झडपासाठी सुद्धा करतात. संदर्भ : (१) शिक्षक हस्तपुस्तिका, इयत्ता ९ वी - V1 (यंत्र अभियांत्रिकी मूलतत्त्वे), पान नं.२६२ ते २७०. (२) ग्रामीण तंत्रज्ञान - पॅक्टीकल हँडबुक, पान नं. ४० ते ४३. दिवस : सहावा प्रात्यक्षिक : सोल्डरींग-पत्र्याचा साधां जोड करणे. जोड फ्लक्सने स्वच्छ करणे, सोल्डरींग करणे. प्रस्तावना : आधुनिक युगात मानवाने प्रगती केलेली आहे. नवनवीन वस्तू निर्माण केल्या. गॅस, शेगडी व इलेक्ट्रीक वस्तू लोक वापरत आहेत. त्याचप्रमाणे निसर्गातील केरोसीन या द्रव इंधनावर चालणारा स्टोव्ह सुद्धा वापरतात. हे स्टोव्ह काही दिवसानंतर गंजून नादुरुस्त होतात. दुरुस्त करण्यासाठी सोल्डरींग करणे जरुरी असते. आपण सोल्डरींग हे कौशल्य आत्मसात केले तर आपल्याला कमी किंमतीत स्टोव्ह किंवा इतर धातुच्या वस्तू दुरुस्त करता येतात. त्यासाठी सोल्डरींग करणे या प्रात्यक्षिकाचा अभ्यास करू. दोन एकाच धातुचे सांधकाम करावयाचे असते, तेव्हा सोल्डरींग करतात. सोल्डर हा कथील आणि शिसे यांचा मिश्रधातू आहे. सोल्डरमध्ये ६०% कथील व ४०% शिसे असते. सोल्डरींग ही तात्पुरती जोडणी असते. त्याचप्रमाणे जोडलेले भाग नको असल्यास उष्णतेने वेगळे करता येतात. सोल्डर कमी उष्णतामानावर विरघळते. सोल्डरींग ही पातळ पत्र्यावर करतात.