या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पूर्वतयारी : उपक्रमाची निवड : (१) गावातील एखाद्या व्यक्तीचा स्टोव्ह दुरुस्त करून द्या. (२) दुरुस्त झालेला स्टोव्ह चालू करून पहा. (३) पत्र्याचा डबा किंवा नरसाळे तयार करून सांधे सील करा. (४) कचऱ्याची सुपली G.I. पत्र्यापासून तयार करा. (५) तांबा व पितळेचे भांडे सोल्डरींगच्या साहाय्याने दुरुस्त करा. (६) पत्र्याची नळी तयार करा. प्रात्यक्षिक पूर्वतयारी: (१) प्रात्यक्षिकासाठी लागणारे साहित्य व साधने टेबलवर मांडून ठेवा. (२) मुलांचे गट पाडून कामे वाटून द्यावीत. (३) साधने, हत्यारे व काम करतानाची दक्षता व सुरक्षितता सांगा. निदेशकांनी करावयाची पूर्वतयारी : (१) निदेशकाने प्रात्यक्षिकासाठी लागणारे साहित्य (उदा. सोल्डर, फ्लक्स इ.) आणून ठेवणे. (२) ब्लो लँप दुरुस्त आहे किंवा नाही हे पाहून घेणे. नादुरुस्त असल्यास दुरुस्त करून घेणे. (३) प्रात्यक्षिकासाठी वापरण्यात येणारी हत्यारे, साधने व्यवस्थित आहेत ना हे तपासून पाहणे, अपेक्षित कौशल्ये : (१) साहित्याची हाताळणी करता येणे, (२) सोल्डर, फ्लक्सची माहिती असणे, (३) सोल्डरींग व्यवस्थित करता येते. (४) स्टोव्ह लिकेज शोधता येणे, (५) पत्रा कटींग करताना योग्य साधनांचा (कात्री, कटर मशीन इ.) वापर करण्यास शिकणे. (६) मापनानुसार पत्रा कटींग करता येणे. (७) मापन येणे आवश्यक आहे. (८) ब्लो लँप पेटवणे व हाताळणी ज्ञान असणे. सोल्डरींग पॅक्टीस (डबा तयार करणे.) अपेक्षित कौशल्ये : (१) पत्रा कापणे. (२) सोल्डरींग करणे, साहित्य : जी.आय.पत्रा, हायड्रोक्लोरिक आम्ल, फ्लक्स, सोल्डर इ. साधने: मोजपट्टी, स्टेक , ब्लो लँप इ. हत्यारे : रेखणी, स्लिप, मॅलेट, कानस, खड्या, पक्कड इ. कृती:(१) प्रात्यक्षिकासाठी लागणाऱ्या साधनांची व हत्यारांची माहिती घ्या. (२) आकृतीत दाखविल्याप्रमाणे पत्र्यावर आखणी करून घ्या. (३) आखणीप्रमाणे कात्रीने पत्रा कापून घ्या. (४) आकृतीत दाखवल्याप्रमाणे पत्र्याच्या घड्या घाला. (५) जोडीची जागा कानशीने घासून व नंतर हायड्रोक्लोरिक आम्लाने स्वच्छ करा. (६) जोडाच्या जागेवर फ्लक्स लावा. (७) दरम्यान ब्लो लँपच्या ज्योतीवर धरून खड्या थोडा लाल दिसेपर्यंत गरम करा. (८) गरम खड्या झिंक क्लोराईडमध्ये बुडवा. (९) नंतर खड्या सोल्डरला लावा म्हणजे खड्याला थोडे सोल्डर चिकटेल. (१०) खड्या अमोनियम क्लोराईडमध्ये बुडवा म्हणजे खड्याला चिकटलेले सोल्डर खड्याच्या टोकावर पसरेल. ५६