या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(११) जोड पक्कडीत व्यवस्थित धरून जोडावर एका ठिकाणी खड्या टेकवा. (१२) जोड गरम झाल्यावर खड्या जोडाच्या कडेने फिरवा. (१३) जोड थंड होऊ द्या. नंतर तो स्वच्छ करून धुवा व कोरडा करा. दक्षता : (१) घड्या घालताना पत्रा वाकल्यास मॅलेटने ठोकून सरळ करा. (२) जोडाच्या जागी धूळ, तेलकटपणा व गंज राहणार नाही, याची काळजी घ्या. (३) हायड्रोक्लोरिक आम्ल लावताना अंगावर किंवा कपड्यावर सांडणार नाही, याची काळजी घ्या. (४) खड्या गरम करण्यापूर्वी कानशीने घासून घ्या. (५) ब्लो लँप पेटवताना त्याचे तोंड भिंतीकडे करा. खड्या प्रमाणापेक्षा जास्त तापवू नका. (७) गरम खड्या व्यवस्थित गरम झाला आहे असे समजा. (८) सोल्डरींग करताना जॉबची बाजूची जागा गरम होऊ नये म्हणून त्या जागेवर ओले कपडे टाका. (९) गरम खड्या टेबलवर, बेंचवर किंवा खाली ठेवू नका. (१०) शेवटी सर्व जोडावर सोल्डरींग व्यवस्थित झालेले आहे याची खात्री करा. शिक्षक कृती : (१) विस्तारचित्राची संकल्पना समजावून सांगा. (२)पत्र्यावर आखणी कशी करायची ते दाखवा. (३) पत्रा कसा वाकवावा ते शिकवा. (४) ब्लो लँप कसा पेटवावा ते शिकवा. (५) काम पूर्ण झाल्यावर जोड धुऊन-पुसून का ठेवावा ते सांगा. आपणास हे माहीत आहे का? (१) पत्रा कापण्यासाठी कात्री (स्निप) वापरतात. कात्रीचे आकारानुसार स्ट्रेट, युनिव्हर्सल आणि पाईप स्निप असे वेगवेगळे प्रकार पडतात. (२) पत्र्याचे काम करताना तो वाकवण्यास स्टेक वापरतात. याच्या सोयीने स्टेक वेगळ्या आकाराचे असतात. (३) मॅलेट मऊ धातू,फायबर/लाकडापासून तयार करतात.कामाच्या सोयीनुसार मॅलेटचा आकार वेगळा (४) सोल्डरींगमध्ये धातुचे दोन तुकडे त्यापेक्षा कमी विलयबिंदू असलेला मिश्रधातू वापरून जोडतात. (५) विशेषतः पातळ पत्रे जोडण्यासाठी, विद्युतवायरचा जोड करण्यासाठी, गळती होऊ नये म्हणून सोल्डरींगचा उपयोग करतात. (६) सोल्डरींगसाठी वापरल्या जाणाऱ्या मिश्रधातूला सोल्डर म्हणतात. कथील आणि शिसे ठराविक प्रमाणात मिसळून सोल्डर तयार करतात. सर्वसाधारण कामासाठी कथील व शिसे यांचे ५०:५०, ६०:४० प्रमाण असलेले सोल्डर वापरतात. (८) प्रक्रियेदरम्यान उष्णतेने धातुचे ऑक्सिडीकरण होऊ नये म्हणून जोडावर फ्लक्स लावतात. फ्लक्समुळे सोल्डर लवकर वितळते तसेच प्रवाही बनते. (९) सर्वसाधारण कामासाठी फ्लक्स म्हणून झिंक क्लोराईड, अमोनियम क्लोराईड किंवा रेझिन वापरतात. (१०)जोड मजबूत होण्यासाठी जाडाचा पृष्ठभाग रासायनिकदृष्ट्या सुद्धा स्वच्छ होणे आवश्यक असते. (११)सोल्डर वितळवण्यास खड्याचा करतात. (१२) खड्याचे साधा व विजेवर चालणारा असे दोन प्रकार आहेत. (१३) साधा खड्या ब्लो लँपवर गरम करतात. स्वाध्याय : (१) जॉब करताना केलेल्या कृतीचा फ्लो चार्ट तयार करा. (२) काम करताना आलेल्या अडचणी व त्यावर केलेली उपाययोजना लिहा. (३) जॉबसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा बाजारभाव पहा. (४) वापरलेल्या कच्च्या मालाची किंमत, मंजुरी, अप्रत्यक्ष खर्चइ.च्या आधारे जॉबची किंमत काढा. ५७