या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

टिनचा मेल्टिंग पॉईंट २३२० सें.ग्रे. आणि लीडचा ३२७° सें.ग्रे. परंतु दोन्ही धातुंचे सारख्या प्रमाणात मिश्रण असल्यास त्या मिश्रणाचा मेल्टिंग पॉईंट २०५० सें.ग्रे. आहे. फ्लक्स (Flux) : सॉफ्ट सोल्डरींगसाठी दोन प्रकारचे फ्लक्स वापरतात-१) करोसिव्ह २) नॉनकरोसिव्ह करोसिव्ह (Corrosive) : या फ्लक्सच्या वापरामुळे सांध्यावर गंज चढण्याची शक्यता असते. म्हणून सांधकाम झाल्यावर सांधा चांगला स्वच्छ धुऊन काढावा. ज्या सांध्यास महत्त्व नसते अशा ठिकाणी हे फ्लक्स वापरतात. विजेच्या उपकरणासाठी हे फ्लक्स वापरीत नाहीत. यामध्ये पुढील फ्लक्स प्रकार येतात. झिंक क्लोराईड, अमोनियम क्लोराईड, हायड्रोक्लोरिक अॅसिड इत्यादी. नॉनकरोसिव्ह फ्लक्स : हे फ्लक्स पाईन वृक्षाच्या खोडातील राळेपासून (Resin) बनवितात. या फ्लक्समुळे सांध्यावर गंज राहत नाही. म्हणून महत्त्वाच्या सोल्डरींग कामासाठी या फ्लक्सचा वापर करतात. (उदा. : इलेक्ट्रिकल उपकरणांचे सांधे साधण्यासाठी वापरतात.) निरनिराळ्या धातुसाठी कोणत्या प्रकारचे फ्लक्स वापरावे हे खाली दिले आहे. | सांधावयाचा धातू फ्लक्स प्रकार १) स्टील, टीन झिंक क्लोराईड २) ब्रास, कॉपर, ब्रांझ झिंक क्लोराईड, रेझिन (राळ) ३) गॅल्व्हेनाईज्ड आयर्न, झिंक हायड्रोक्लोरिक अॅसिड सोल्डरींग आयर्न : सोल्डर करण्यासाठी जे साधन वापरले जाते त्यास सोल्डरींग आयर्न म्हणतात. सोल्डरींग आयर्न टिपला उष्णता (१) इलेक्ट्रिक व (२) ब्लो-लँप या दोन प्रकारे देता येते. सोल्डरींग आयर्नचे टिप कॉपरपासून बनविलेले असते. त्यामुळे सोल्डर लवकर वितळते, तसेच वितळलेले सोल्डर त्याद्वारे सांध्यामध्ये पोहोचविता येते. सोल्डरींग पद्धत : ज्या ठिकाणी सांधावयाचे आहे त्या भागास फाईलिंग एमरी पेपर वगैरे वापरून स्वच्छ करावे. त्या भागवार ऑईल किंवा ग्रीस, रंग वगैरे राहता कामा नये. (या पदार्थामुळे सोल्डरींग बरोबर होणार नाही.) संदर्भ : (१) फ्लो चार्ट - शि.ह.पु., इ.९वी, पान नं.३६ ते ३९. (२) उपक्रम : शि.ह.पु., इ.९वी, पान नं.१२४. (३) वेल्डींग टेक्नॉलॉजी, लेखक : एम.बी.दंडगव्हाळ, पान नं.८६ ते ८९. टिप दिवस : सातवा प्रात्यक्षिकाचे नाव : बांधकाम - आर.सी.सी. कॉलम तयार करणे. प्रस्तावना : जसे जनावरांच्या शरीरात हाडांच्या सांगाड्यामुळे उरलेल्या लवचिक अवयवांना आधार होतो तसेच मानव सांगाडा तयार करून त्याद्वारे दुसऱ्या कमजोर पदार्थांना आधार देतो. लोखंडाचे सांगाडे काँक्रीट भरल्यावर काँक्रीटपेक्षा मजबूत होतात. सिमेंट काँक्रीट दाबामध्ये मजबूत असते, परंतु ताणामध्ये कमजोर असते, म्हणून काँक्रीट वापरताना ज्या भागामध्ये ताण येईल तेथे लोखंडी सांगाडे घालतात. त्यालाच RCC (रिएन्फोर्स सिमेंट काँक्रीट) म्हणतात. R.C.C. कॉलममध्ये मजबुती जास्त असल्यामुळे आयुष्य (टिकाऊ) जास्त असते. किंमत कमी असून बनविण्यास सोपा आहे. जास्त वजनास उपयुक्त आहे. आपण बांधकामातील अतिशय उपयुक्त असे R.C.C. कॉलम तयार करण्याचे कौशल्य शिकून घेऊ.