या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२८ / अभिव्यक्ती

असतो. निदान एक प्रकारचा साचेबंदपणा त्यात आलेला असतो. कै. मामा वरेरकरांचे याही बाबतीत वैशिष्ट्य लक्षात घेण्यासारखे आहे. आपल्या उतारवयातही त्यांनी लेखन केले, पण नव्या हुरूपाने, नव्या जोमाने ते वयाने वृद्ध झाले असले तरी त्यांची प्रतिभा ही अधिक परिपक्व, प्रगल्भ झाल्याचेच दिसून आले. म्हणून ही गोष्टदेखील नमूद करावीशी वाटते.
 १९५५ साली प्रकाशित झालेले वरेरकरांचे 'भूमिकन्या सीता' हे पौराणिक नाटक त्यांच्या टवटवीत ताज्यातवान्या प्रतिभेचे प्रतीक ! हेच वरेरकरांचे अखेरचे आगळे नाटक.