या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मुक्तेश्वर चरित्र शोध / ५१ आसपास मुक्तेश्वर जन्मशक येतो. राघव कवीच्या प्रमाणोक्तीवरून शके १५२१ हा एकनाथांचा निर्याण शक ठरतो. त्याप्रमाणे २५ वर्षे म्हणजे १४९६ हाच मुक्ते- श्वराचा जन्मकाल ठरतो. रंगनाथ स्वामी व जयराम भिडेकृत संतमालिकेतूनही हेच सूचित होते. संक्षेपरामायणातील वर्णनातून मुसलमानांच्या भ्रष्टाचाराची कल्पना येते. राजवाड्यांच्या मतेही 'त्यांच्या, शिवाजीच्या चळवळी पैठणपर्यंत पोहोचल्या नव्हत्या' हे मान्य करावे लागते. यावरून तो शिवपूर्वकालात श १४९६ मध्ये जन्मला असावा. जन्म शके १५३१ डॉ. के. ना. वाटवे, महाराष्ट्र सारस्वतकार वि. ल. भावे, बा. अ. भिडे, डॉ. पंडित आवळीकर इत्यादी संशोधकांच्या मते मुक्तेश्वराचा जन्म शिवकालात . शके १५३१ मध्ये झाला. वि. ल. भावे यांचा आधार, कोडितकर अत्रे ह्यांच्या दप्तरा- तील टीपणवही व संस्थाने यांच्या जंत्रीतील नोंद हे आहेत. तर दा. के. ओकांनी तंजावर येथील श्री. गोविंदबाळ स्वामींच्या मठातील जुन्या हस्तलिखितातून शके १५३१ हा जन्मशक निश्चित केला आहे. मुक्तेश्वरी महाभारतातील भाषा व वातावरण मात्र या मताशी विसंगत आहे. डॉ. पंडित आवळीकर यांनी मुक्तेश्वराला कर्नाटकी ठरविले. तेही शके १५३१ हाच त्यांचा जन्मशक मानतात. निर्णायक शोधाची आवश्यकता मुक्तेश्वरांसारख्या श्रेष्ठ कलाकवीच्या बाबतीत तो संत एकनाथांचा नातू असूनही जन्मशक ठरविताना अशी मते आणि मतांतरे व्यक्त झालेली आहेत. उपरोक्त संशोधनातील माहितीतही निःसंदिग्धता नाही. तेव्हा अशा संदिग्ध मताभिव्यक्तीमुळे पुराव्याअभावी केवळ पुढील अनुमान बांधता येते. शके १५३१ आणि शके १४९६ ( वा १४९५ ते १५०० ) यांपैकी शके १४९६ हाच मुक्तेश्वरांचा जन्मशक अस- ण्याची अधिक शक्यता आहे. कारण मुक्तेश्वरांचे वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व संत एकनाथांच्या प्रगल्भ वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाचा संस्कार घेऊन घडलेले असावे. पैठणलाच मुक्तेश्वराला कलागुणांचे बाळकडू मिळाले असले पाहिजे. अन्यथा संपूर्ण उमेदीचा काळ मातुलगृही (पैठणला ) आजोळी कोणी काढील असे वाटत नाही. मुक्तेश्वराने शिवकालातील भाग्योदय पाहाण्यापूर्वीच आपली इहलोकीची यात्रा संपविली असावी असे त्यांच्या साहित्यातील वर्णनावरून वाटते. कुरुंदवाड या पटवर्धनी संस्थानाजवळील 'तेरवाड' या गावी मुक्तेश्वराची समाधी आहे. पण मुक्तेश्वराच्या समाधीकालाबाबतही वाद आहेत. शके १५६७ ते शके १५८२ पर्यंत हा काल आगेमागे मानला जातो. निर्णायक पुरावा याहीबाबत उपलब्ध नाही. .