या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५८ / अभिव्यक्ती प्रवेश केला नसेल ना, या कल्पनेने त्यांनी आसपास, अगदी दऱ्याखोऱ्यातून बारकाईने शोध घेतला. परंतु तसे काही घडल्याचे त्याला काही आढळले नाही. याचा अर्थ विशाळदेवाने फक्त भडोच परिसरात जवळपासच कोणा सिद्धपुरुषाने देहत्याग केला की काय याचा शोध घेतला असे मानावे लागते. कारण यावेळी निश्चितच द्वारकेचे चांगदेव राऊळ हे सिद्धपुरुष अंतर्धान पावलेले होते. म्हणूनच तर एक अवतार संपवून दुसरा ' चक्रधर' अवतार धारण करू शकले. अन्यथा 'ईश्वराने स्वतंत्ररीतीने प्रधानपुत्राचे शरीर उठविले' या तळेगावकर पाठातील मताला ग्राह्य मानावे लागेल आणि 'गुर्ज्जराते भरवसों प्रधानपुन पतीत पुर उत्थापूनि पुरस्वीकार' या त्यांच्या आख्यायिकेच्या शीरा - वळीला व 'श्री चांगदेव राऊळासी आज्ञा दिधली : तेहि निजधामा बीजे केले ' या मताला दुजोरा देण्याची आपत्ती ओढवते. त्यांच्या मते ईश्वराने स्वतंत्ररीतीने प्रधानपुनाचे शरीर उठविले असे दिसते. पिढीपाठ सर्वात प्राचीन असल्यामुळे सांप्र- दायिकांची त्यावर श्रद्धा असून त्याला ते प्रमाण मानतात. ही विश्वसनीयता लक्षात घेऊन डॉ. वि. भि. कोलते यांनी 'द्वारावतिकार चांगदेव राऊळ आणि चक्रधर एकच होत' हे मत विशेष योग्य वाटते असे म्हणून स्वीकारलेले आहे.' संस्कृत 'रत्नमाला स्तोत्नातही' अशाच प्रकारचा उल्लेख आढळतो. 'सप्ताहमाग्रहमवेक्ष्य विहायदेहं देवो दयालुरपरां तनुमादधार । उत्थापयन्सपदि तत्पतितं परेतं यद्गुर्जराधिपति मंत्रिकुमारकस्य ।। ' या आधारावरून डॉ. कोलते यांनी माझ्या मते द्वारकावतीकार चांगदेव राऊळ यांचाच पुनरावतार म्हणजे श्री चक्रधरस्वामी होत असे निःसंदिग्धपणे नमूद केलेले मत अधिक ग्राह्य वाटते. श्री चक्रधरांचे परात्पर गुरू श्री चांगदेव राऊळ 'द्वारावतीकार तेचि आमचे गोसावी' असे मानून अनुसरलेले शिष्य श्री चक्रधर म्हणत तर लौकिकात ' चांगदेव राऊळ' हे नाव रूढ होते. चक्रधरस्वामींचे गुरू गोविंद प्रभू व गोविंद प्रभूंचे गुरू चांगदेव राऊळ या अर्थाने चांगदेव राऊळ चक्रधरांचे परात्पर गुरू ठरतात. स्वतः श्री चक्रधरस्वामींना त्यांच्याबद्दल विशेष आदर होता. त्यांचे विद्यावंत ज्या ज्या वेळेला स्वामींच्या भेटीसाठी येत त्या त्या वेळेला स्वामी त्यांचे मोठे आदरातिथ्य करीत असत. एवढेच नव्हे तर बाईसाकडून त्यांची पूजाही करवीत असत? आणि म्हणूनच यात्रेला जाणान्या महदंबेला चांगदेव राऊळावरील आपल्या उत्कट भक्तीनेच अत्याग्रहपूर्वक चक्रधरस्वामी म्हणतात, 'तुम्ही द्वारावती कारा श्री चांगदेव राऊळाचिया गुंफास्थाना जायिजे हो ।' १. श्री चक्रधर चरित्र : लेखक डॉ. वि. भि. कोलते (१९५२) पृष्ठ १८ २. लीळाचरित्र : भाग २, पान ३४; भाग ३ पान ८ (संपा. ह. ना. नेने)