या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सतरा मनमोर : एक आस्वाद ' मनमोर हा प्रा. चंद्रकांत वर्तक यांचा तिसरा कथासंग्रह. यापूर्वी त्यांचे 'पारंब्या' व 'फुलपंखी दिवस' हे दोन कथासंग्रह आणि 'अंकुर' ही एक लघुकादंबरी प्रसिद्ध झालेली आहे. या पार्श्वभूमीवर 'मनमोर ' हा नवा कथासंग्रह वाचकांपुढे आलेला आहे. निवडक दहा कथांचा हा संग्रह. १९६७ ते १९७२ या पाच वर्षांत या कथा नामांकित नियतकालिकांच्या खास अंकांतून प्रथम प्रकाशित झालेल्या आहेत.. कथात्मक लेखनाकडे स्वभावत: ओढा असलेल्या प्रा. वर्तकांनी नेमके पण प्रामाणिक परिणाम साधणारे, रूढ प्रवाहापासून अलिप्त राहून, कोणत्याही वाङमयादर्शाच्या ( norms ) आहारी न जाता लेखन करावयाचे योजिलेले दिसते. नित्याच्या पठडीतील प्रणय- भावना चित्रित करणाऱ्या ह्या कथा म्हणूनच नाहीत तर प्रचीतीच्या विश्वाला साकार करण्याचा यत्न येथे दिसतो. मनमोरमधील दहा कथा दहा रूपांत अवतरल्या आहेत. अगदी बाह्य लांबी- पासून तो टिपलेल्या अनुभूतीच्या लयीपर्यंत एका कथेसारखी दुसरी कथा म्हणता येणार नाही. या कथांना स्वरूप ( स्व – रूप ) प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य या ठिकाणी प्रत्ययाला येते. परिणाम साधण्याची, जाणीव करून देण्याची, भाषेची कुंवतही प्रत्येक कथेत कमीअधिक स्वरूपात आढळेल. प्रयत्न योग्य दिशेने आहे. 'फेरा' या कथेची जन्मकथा प्रा. वर्तक यांनी आलोचना : ऑक्टोबर : १९७२ मधील 'लघुकथा आणि इतर वाङ्मय प्रकार' या आपल्या लेखात सांगितली आहे. 'नगरपालिका कर्मचाऱ्यांचा संप झाला त्याचे एक छायाचित्र - ' इंडियन एक्स्प्रेस' या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले होते. 'स्मशानातील कर्मचारी संपावर गेल्यावर तेथे पहायासाठी नियुक्त केलेले दोन पोलीस ह्या छायाचित्रात टिपले गेले होते. तेंव्हा दिवसभरात या पोलिसांची काय मनःस्थिती झाली असेल - त्यांना आलेला कंटाळा - वैताग - प्रेत जळत असतानाचा एकाकीपणा आणि तेथील सारे वातावरण