पान:अमेरिका पथदर्शक.pdf/19

हे पान प्रमाणित केलेले आहे.
अमेरिका-पथ-दर्शक

ण्यांत घालवीत असू. दुपारी मी शीख बंधूंची चवकशी करण्याकरितां त्यांच्याकडे गेलों. ते देखील मागील दिवसांचे दुःख पार विसरून आनंदांत चूर असलेले मला आढळले. त्रास इतकाच कीं, त्यांना डेकवर शेळ्यामेंढ्य़ाप्रमाणें खचून भरण्यांत आलें होतें; व जहाजावरील नावाडी त्यांच्याशीं निदर्यपणें वर्तन करीत असत. ह्याहून विशेष गोष्ट ही कीं, त्यांना मेंढ्य़ाच्या विष्टेच्या दुर्गंधींतच सदासर्वकाळ राहवें लाग. त्यांचें सर्व सामान पाण्यानें खराब झालें होतें कित्येक पदार्थ तर समुद्रांत वाहूनहि गेलें होते,व कित्येकांचे कपडे तर अजून ओलेच होते ज्यांच्याजवळ झोल्याची शय्या (Hammock-bed) होती, त्यांस फार आराम झाला, ते झोंप तरी घेऊं शकत. ह्या करितां डेकवर प्रवास करणाऱ्यानी झोल्याचें आंथरुण अवश्य जवळ बाळगावें. असें केल्यापासून प्रवासांत फार आराम असतो. जहाजावर मागितल्यानें कोणतीहि वस्तु मिळूं शकत नाही. आपली वस्तु असेल तरच वेळेवर काम देईल.
 सरतें शेवटीं हालअपेष्टा सोसून व जहाजावरील प्रवासाच्या सुखाचाही मधून मधून अनुभव घेत, आम्हीं एकदांचें पीनांगाला पोहोंचलों. आगबोट सकाळी पीनांगाला पोहोंचलीं. आज आकाश निरभ्र असून प्रातःकाळचा देखावा फारच आल्हादकारक होता. स्टीमर बंदराच्या एका बाजूस किनाऱ्यापासून काही अंतरावर उभी राहिली, व पीनांग बंदरावर उतरणा-या प्रवाशांकरिता लहान लहान नांवा जहाजा जवळ येऊं लागल्या. आम्ही तर उतरण्याच्या तयारीनें केव्हांपासूनच नांवेची प्रतिक्षा करीत होतो. जहाजावरील नोकराला थोडेबहुत बक्षीस दिलें; व आपल्या कर्तव्यातून मुक्त झाल्यावर आम्ही आपले सामानासह एका नावेत बसलों व नांव किना-याकडे चालू लागली.
 पीनांग हे स्ट्रेटसेटलमेंटमधील एक फार सुंदर शहर आहे. ह्या शहराची रचना निराळ्याच प्रकारची आहे. अशा रचनेचे शहर पाहण्याचा प्रसंग मला ह्यापूर्वी कधीच आला नव्हता.सुंदर व साफ सूफ केलेल्या गल्ल्या व त्यावरून इकडून तिकडे धावणाऱ्या 'जिनरक्षा' नजरेस पडत होत्या. आम्ही पूर्वी केव्हां जिनरक्षाचें वाहन पाहिलें नव्हतें. तेव्हा स्वाभाविकपणेंच ह्या वाहनावर बसण्याची आम्हांस इच्छा झाली. एका जिनरक्षेवर मी बसलों व दुस-या जिनरक्षेवर माझे मित्र स्वार झाले. ह्याच जनरक्षांवर आपआपलें सामान लादून आम्हीं