पान:अमेरिका पथदर्शक.pdf/47

हे पान प्रमाणित केलेले आहे.
३४
अमेरिका-पथ-दर्शक

असते. परंतु 'कॉर्नेजी विश्वविद्यालय'खास स्थापत्याचें शिक्षण देण्याकरितां स्थापन करण्यांत आलें आहे. तेथील अधिक माहिती हवी असल्यास, The Registrar, Carnegie Technical Institute, Pittesburg. Pa. U. S. A. ह्या पत्यावर पत्र पाठवून माहितीपत्रक मागवून घ्यावें.
 ज्यांना दांत बसवण्याची कला शिकावयाची आहे, त्यांनीं न्यूयार्क, बोस्टन, शिकागो ह्या सारख्या मोठ्या शहरीं जावें. ह्या शहरांतून ही कला शिकविण्याच्या शाळा उघडण्यांत आल्या आहेत.
 प्रश्र्न २६--अमेरिकेंत Night Schools संबंधी कशी काय व्यवस्था आहे ?

 उ०--जेथें रात्रीच्या शाळा नाहींत असे अमेरिकेंत एकहि मोठें शहर नसेल. ज्यांना दुपारीं शाळेंत जाण्यास सवड नसते, त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था ह्या शाळांतून केलेली असते. कार्नेजी विश्र्वविद्यालयांतहि रात्रीच्या शाळा आहेत. ह्याचप्रमाणें जेथें जेथें मजुरांची भरती फार आहे व त्यांना शिक्षणाची गोडी आहे, तेथें तेथें रात्रीच्या शाळा उघडण्यांत आल्या आहेत. ह्या शाळांत फी अधिक नसते व शिक्षण सुविद्य अध्यापकांकडून देण्यांत येतें. अमेरिकेंत शिक्षण मिळविण्याकरितां ब-याच सोई आहेत, हे हिंदी विद्यार्थ्यांनी लक्षांत ठेवावें. ज्याला विद्येची मुळीच गोडी नाहीं त्यालाच केवळ अमेरिकेंत विद्या संपादन करतां येणार नाहीं.

 प्रश्र्न २७--अमेरिकेंतील ऋतूसंबंधी कांहीं माहिती सांगण्याची कृपा करावी'
 उ०--अमेरिकेंत थंडी फार असते. उत्तर व पूर्व भागांतील संस्थानांत तर फार बर्फ पडतें. मध्यभागांतील संस्थानांतहि बर्फ पडतें. आक्टोबर महिन्यांत थंडी पडायला सुरुवात होतें व मे महिन्यांत कोठें थोडी थंडी कमी होतें. पश्र्चिम व दक्षिण भागांतील संस्थानांत मात्र बर्फ केवळ नांवाला पडतें. ह्या देशांत बाहेर निजण्याची मुळीच सोय नाही. सर्व ऋतूंत लोक घरांतच निजतात. अमेरिकेच्या ब-याच भागांतील हवा हिंदी लोकांस मानवणार नाही, कारण, आपणांस इतकी थंडी सोसण्याची संवय नसते. आमच्या कित्येक बांधवांचें तेथें हिवाळ्यांत फार हाल होतात. मेमध्यें थंडी थोडी कमी होते व जूनमध्यें वसंत ऋतूला आरंभ होतो. सप्तेंबरपर्यंत चांगलाच उकाडा असतो. ह्या महिंन्यांतील हवा कोरडी असते. ह्या दिवसांत पाऊस पडत नाही. एखादे दिवशी