पान:अमेरिका पथदर्शक.pdf/62

हे पान प्रमाणित केलेले आहे.
४९
प्रश्र्नोत्तरें.

देशांतील मारवाडी, बनिये, खत्री, खोजे, सिंधी वगैरे लोकांनीं अमेरिकेंत जाऊन पुष्कळ द्रव्य मिळविलें पाहिजे.
 प्र० ५३--अमेरिकेंतील नाण्यासंबंधींची माहिती सांगण्याची कृपा करावी.
 उ०--अमेरिकेतील नाण्याला 'डॉलर' ही संज्ञा आहे. हा रुपयापेक्षां बराच मोठा व जड असतो. ह्याची किंमत साधारणतः तीन रुपये दोन आणे असते. (हल्ली शंभर डालरची किंमत अजमासें २७५ रुपये होते.) डॉलरचे शंभर सेंन्ट्स असतात, सेंट हे आपल्याइकडील पैशाच्या स्वरूपाचें नाणें आहे. एक सेंटची किंमत आपल्याइकडील सुमारें दोन पैशांइतकी होतें. डॉलरची छोटीं छोटीं नाणीं अर्धा डॉलर, क्वार्टर, डाईम, निकल इत्यादि असतात एक निकल पांच सेंटाबरोबर असून त्याची किंमत अडीच आणे असते. क्वार्टर पंचवीस सेंटबरोबर अर्थात् १२॥ आणे किंमतीचा असतो. क्वार्टरला 'टू बिट्स'हि (Two Bits) म्हणतात. डाईम नाणें दहा सेंट किंमतीचें असतें.
 एखाद्या माणसास तीन डॉलर मजुरी मिळत असल्यास आपल्या इकडील हिशोबानें त्याला ९ रु. ६ आणे मिळतात असें समजावें.

 प्र० ५४--अमेरिकेचें पोस्टाचे दरहि कळविण्याची मेहरबानी करावी.
 उ०--अमेरिकेला पाकीटांतून पत्र पाठवावयाचें असल्यास पाकीटावर तीन आण्याचीं तिकीटें लावली पाहिजेत. कार्ड पाठवावयाचें झाल्यास त्यावर एक आण्याचें तिकीट लाविलें पाहिजे.

 प्र० ५५-कोणाला अमेरिकेकडून पुस्तकें मागवावयाची असल्यास त्यानें काय करावें ? कारण तेथें व्ही. पी. ची पद्धति नाहीं. असें आम्ही ऐकितों.

 उ०-अमेरिकेमध्यें व्ही. पी. ची पद्धति नाहीं. पुस्तकें मागावयाची झाल्यास प्रथम चांगली विचारपूस करून नंतर मागवावी. पुस्तकें विकणा-या ज्या प्रसिद्ध कंपन्या असतात त्यांच्याशीं ह्याकरितां पत्रव्यवहार करावा. उदाहरणांर्थ Library of Oratory ची पुस्तकें मागवावयाची झाल्यास खालील पत्त्यावर कार्ड टाकून सूचीपत्र मागवून घ्यावें.

  The Warner Company,

   Akron, Ohio, U. S. A.

 अ. ४