पान:अयोध्येचे नबाब.pdf/141

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२२ अयोध्येचे नबाब. [ भाग wwwwwwwwwwwwwwwwmarmarmawwwwwwwmire . ह्याप्रमाणे नबाब वाजिदअल्लीशहा ह्यास नवीन तहाचा मसुदा जनरल औट्राम ह्यांनी सादर केला, व तो मान्य करून त्यावर सही देण्याबद्दल नबाबास तीन दिवसांची मुदत दिली. ही कलमें वाचतांच त्यास दुःखाचा अनावर वेग उत्पन्न झाला. त्याने मुसलमानी पद्धतीस अनुसरून, ब्रिटिश सरकाराचा थोरपणा व वैभव ह्यांचे गुणानुवादन करून आपला नम्रपणा व्यक्त केला, व ह्या तहावर सही करण्यास आपली योग्यता नाही वगैरे सर्व औपचारिक शब्दलाघव दाखविले. रेसिडेंटानें, तह मान्य केला नाही तर भयंकर परिणाम ओढवतील, व शेवट चांगला होणार नाही, वगैरे सर्व गोष्टी स्पष्ट शब्दांनी त्यास समजून सांगितल्या. तेव्हां नबाबाच्या नेत्रांस अश्रु येऊन त्याने, ब्रिटिश सरकाराने आपल्या पूर्वजांवर केलेल्या उपकारांचे स्मरण केले. व स्वतःची करुणास्पद स्थिति त्यांस निवेदन केली. एवढेच नव्हे, तर त्याने आपल्या डोकीचा मंदील काढून तो रेसिडेंटाच्या हाती दिला, आणि त्याच्या हातीपायीं पडून त्याने तह अमलांत आणू नये म्हणून त्याची विनवणी केली. रेसिडेंटाने ह्या तहाच्या अटी मान्य केल्यावांचून दुसरा कोणताही विचार होणार नाही असे स्पष्ट सांगून त्यास तीन दिवसांची मुदत दिली, व नबाबाचा निरोप घेतला, नबाब वाजिदअल्लीशहा ह्याने दुमंत्र्याच्या नादानें तहाच्या अटी मान्य करण्याचे नाकबूल करून तिसरे दिवशी त्याप्रमाणे रेसिडेंटास जबाब पाठविला. तो मिळतांच जनरल औट्राम ह्यांनी अयोध्येचे राज्य खालसा केल्याबद्दल जाहिरनामे प्रसिद्ध करून ता० ७ फेब्रुवारी इ० स० १८१६ रोजी नबाब वाजिदअल्लीशहा ह्यास लखनौच्या गादीवरून पदच्युत केले, आणि सर्व राज्यसत्ता कंपनीसरकाराच्या नांवाने आपल्या हाती घेतली. नंतर त्यांनी वाजिदअल्ली