पान:अयोध्येचे नबाब.pdf/163

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६ स्थलवर्णन. awrwwmorammarwriwwwanmarr mm ~~rnmmmmmm 'वेस्टमिन्स्टर हॉल' म्हणून ज्याप्रमाणे एक राज्याभिषेकाकरितां स्वतंत्र इमारत आहे त्याप्रमाणे हीही इमारत आहे. येथे लखनौच्या नबाबाचे सिंहासन असून सादतअल्लीच्या मागून झालेल्या सर्व नबाबांचे राज्यारोहणसमारंभ येथेच झाले. नासिरउद्दीन हैदर मृत्यु पावल्यानंतर इ० स० १८३७ मध्ये बादशहा बेगम हिनें मुन्नाजान नामक मुलास गादीवर बसविण्याचा जो यत्न केला व त्यामुळे जो रक्तपात झाला तो ह्याच राजवाड्यांत झाला. ह्या राजवाड्यांतील मुख्य दरवारमहालांत त्या वेळी मोठमोठे आरसे होते, व जिकडे तिकडे रोषनाई केलेली होती. मुन्नाजान ह्यास राज्याभिषेक करण्याकरितां बादशहा बेगम हिने त्यास ह्या महालांत आणिलें होतें. त्या वेळी रेसिडेंट कर्नल लो ह्यांनी त्याचा राज्याभिषेक करण्यास प्रतिबंध केला. . त्यामुळे उभय पक्षांच्या लोकांची चकमक उडाली. त्या गडबडीत ब्रिटिश सैन्यांतील लोक राजवाड्यांत शिरले. त्यांस आरसेमहालाची कल्पना नसल्यामुळे त्यांची प्रतिबिंबें जिकडे तिकडे दिसू लागली; त्यामुळे त्यांस ते शत्रूचे लोक आहेत असे वाटून त्यांनी आरशावर गोळ्या मारल्या व तेथील सामानाचा फार नाश केला ! शेवटी बादशहा बेगम व मुन्नाजान ह्यांचा पराभव होऊन ती उभयतां ह्याच राजवाड्यांत इंग्रजांच्या हाती सांपडली. ह्या इतिहासप्रसिद्ध महत्त्वाच्या गोष्टीमुळे हा राजवाडा प्रख्यात आहे. त्याचप्रमाणे बंडाची समाप्ति झाल्यानंतर अयोध्येच्या तालुकदारांस लॉर्ड क्यानिंग ह्यांनी ह्याच राजवाड्यांत भेटीस बोलाविले व त्याच्यावर क्षमा करून राणीसाहेबांचा जाहीरनामा येथेंच प्रसिद्ध केला. त्या योगानेही ही इमारत लखनौच्या लोकांच्या स्मरणास विशेष कारण झाली आहे. येथे प्रसंगविशेषीं अद्यापि मोठमोठे दरबार भरत असतात. सांप्रत येथे अयोध्याप्रांताचे पदार्थसंग्रहालय केले असून येथे निरनिराळ्या अर्वाचीन व प्राचीन वस्तु, जुन्या तसबिरी, शिलालेख, प्राचीन मूर्ति, कलाकौशल्याची कामें, व पशुपक्षी वगैरे ठेविले आहेत. ह्यामध्ये इ. स. २२३-२२४ ह्या वर्षी समुद्रगुप्त राजानें जो अश्वमेध केला, त्या अश्वाची हुबेहुब प्रतिकृति नेपाळ प्रांतांतील खैरीगडच्या जंगलामध्ये सांपडली, ती येथे आणून ठेवलेली आहे. ती प्रेक्षणीय आहे. त्याचप्रमाणे येथील दरबारमहालामध्ये लखनौच्या सर्व नबाबांच्या तसबिरी आहेत, त्याही फार सुंदर असून पाहण्यासारख्या आहेत. ज्या