पान:अयोध्येचे नबाब.pdf/21

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग २ रा.] सादतखान. हे एक होत. सादतखानाचा बाप मिस्र नासीर हा औरंगजेबाचा मुलगा बहादूरशहा ह्याच्या पदरी मोठ्या अधिकारावर अधि. ष्ठित होता व पुढे काही दिवस तो पाटणा येथील सुभेदारीवर होता. तेथेच सादतखान याचा थोरला भाऊ सयादतखान हाही होता. सादतखान आपल्या बापास भेटण्याकरितां इ० स० १७०५ मध्ये हिंदुस्थानांत आला. त्या वेळी त्याचे अगदी अल्पवय होतें. तो आल्यानंतर काही वर्षांनी त्याचा बाप मृत्यु पावला. तेव्हां तो व त्याचा भाऊ हे दिल्लीस गेले. त्या वेळी दिल्ली येथे बडे बडे अमीर व उमराव ह्यांचे प्राबल्य विशेष असल्यामुळे त्यांनी त्यांचा आश्रय संपादन केला. सरबुलंदखान ऊर्फ नबाब मुबारिझउल्मुल्क जो पुढे फरुखसियर बादशहाचे कारकीर्दीत इ० स० १७१७ मध्ये पाटणाचा सुभेदार झाला, व महमदशहाचे कारकीर्दीत इ० स० १७२४ मध्ये गुजराथचा सुभेदार झाला, तो ह्या वेळी बादशाही दरबारांत बराच नावारूपास चढला होता. त्याच्या खासगीकडे सादतखान ह्याने प्रथम नौकरी संपादन केली. सरबुलंदखान ह्याचा स्वभाव फार गर्विष्ट व मानी असल्यामुळे त्याने सादतखानाची एका क्षुल्लक प्रमादाबद्दल एके वेळी निर्भर्त्सना केली. ती त्या स्वाभिमानी व पाणीदार पुरुषास सहन न होऊन त्याने त्याच्या नौकरीचा राजीनामा दिला, आणि खुद्द बादशहाकडे जाऊन त्याच्या खास रिसाल्याचे आधिपत्य मिळविले. फरुखसियर बादशहाचे कारकीर्दीत सय्यद अबदुल्लाखान व सय्यद हुसेनअल्ली ह्या दोन बंधूंचे विशेष प्राबल्य होऊन, ते करतील ती पूर्वदिशा, असा प्रकार झाला होता. त्यांचे वर्चस्व बादशहास असह्य होऊन त्याने सय्यदबंधूंचे प्रतिस्पर्धी चिनकिलिचखान व राजा सवाई जयसिंग ह्यांस अनुकूल करून घेऊन स्वतंत्र होण्याचा प्रयत्न केला. परंतु तो फार भित्रा व चंच