पान:अयोध्येचे नबाब.pdf/59

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

याचा व भाऊसाहेबांचार असून मराठ्यांचा हा गृहस्थ पा ४ था. ] सुजाउद्दौला. ४७ -साहाय्य केले होते, त्या वेळेपासून त्याचे व मराठ्यांचे बहुतेक सख्य होते. त्यामुळे त्याच्या पदरी दक्षिणेतील कित्येक ब्राह्मण जाऊन राहिले होते. त्यांत पंडित काशीराज नामक एक गृहस्थ होता, ह्यावर सुजाउद्दौल्याची फार मर्नी जडल्यामुळे त्याचा सुजाउद्दौल्याच्या राजकारस्थानांत चांगला प्रवेश झाला होता. हा गृहस्थ पानिपतच्या युद्धामध्ये समक्ष हजर असून मराठ्यांचा पूर्ण हितचिंतक होता. ह्याचा व भाऊसाहेबांचा अंतस्थ पत्रव्यवहार असून त्याने सुजाउद्दौल्यास मराठ्यांच्या बाजूस वळविण्याकरितां अश्रांत परिश्रम केले, असेंही दिसून येते. पेशव्यांचा गणेश पंडित म्हणून एक बातमीदार सुजाउद्दौल्याच्या स्वारीमध्ये होता. त्याचा प्रवेश खुद्द नबाबापर्यंत होत नसल्यामुळे त्यास कच्ची बातमी कळत नसे, तेव्हां त्यास सर्व बातमी गुप्त रीतीनें काशीरानाकडून मिळत असे. काशीराज ह्याने सुजाउद्दौल्याचे मन वळवून त्याजकडून मराठ्यांस मदत करविण्याचा फार यत्न केला, परंतु नजीबखान रोहिला मराठ्यांचा कट्टा शत्रु असल्यामुळे त्याने त्याचे काही चालू दिले नाही. अखेर निकरावर गोष्ट येऊन उभय पक्षांची लढाई झाली व तीत मराठ्यांचा पराभव झाला. ह्यानंतर गिलच्यांनी विजयानंदाच्या भरांत शत्रंची जी कत्तल केली व त्यांच्या जखमी व जीवंत घरलेल्या लोकांची जी विटंबना केली ती सर्वश्रुतच आहे. ह्या वेळी मनुष्यस्वभावास अत्यंत शोभविणारी जी भूतदया व परोपकारबुद्धि ती फक्त ह्या काशीराजाच्या हृदयांत प्रज्वलित होऊन तिने मराठ्यांकडील जखमी झालेल्या वीरवरांचा व धारातीर्थी पतन पावन स्वर्गद्वार जिंकलेल्या नरश्रेष्ठांच्या पुण्यदेहांचा जो परामर्ष घेतला, तो त्या गिलच्यांच्या यशोवैभवापेक्षां शतपटीनें कौतुकास्पद आहे ह्यांत शंका नाही. हा हिंदधर्माभिमानी जातिवंत मराठ्याने सुजाउद्दौल्याच्या