या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अशोक. [प्रकरण असें सत्र सारखें सुरू असतां, एके दिवशी मोठा चमत्कार घडला. तो असा--एक भिक्षु ( बौद्धयति ) भिक्षा मागत फिरता फिरतां त्या स्था- नापाशी आला आणि तें रम्य स्थल व स्वच्छ उदकांचे कारंज पाहून आंत शिरला. लगेच द्वारपालाने त्याचे हातपाय बांधून त्याला यमयातनेचा अनुभव घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे आंत पाठवून दिले. तेव्हां भिक्षुनें मोट्या आर्जवाने देवाचे नांव घेण्यासाठी चार घटकेची मदत मागून घेतली. मध्यंतरी दुसरा एक कोणी पुरुष तशाच रीतीने फसून आंत शिरल्यावरून त्यालाही धरून आणिले होते. नरकाधिपतीने त्याचें डोके चक्रांत अडकावून चेचले. त्यापासून उडालेली रक्ताची चिरकांडी पाहून व त्या प्राण्याची अंतकाळची भयंकर वेदनायुक्त किंकाळी ऐकून, त्या भिक्षुचें अंत:करण चर्र झाले आणि मानवी जीविताची क्षणभंगुरता व जड देहाची नश्वरता त्याच्या हृत्पटलावर पूर्णपणे बिंबून तो एकदम अर्हत् या श्रेष्ठ पदवीस प्राप्त झाला. चार घटका संपल्यावर शिपायांनी भिक्षूला पुन : धरले आणि तप्त तैलाच्या कढईत ढकलले. पण चम- त्कार की अग्नि आपला स्वभावधर्म सोडून तात्काल शांत झाला; तेल थंड झाले; आणि त्या भिसूच्या चेहेन्यावर दु:खाच्या ऐवजी आनंदाचें चिन्ह दिसू लागले. हा चमत्कार अधिकाऱ्यांनी राजाला निवेदित केला. तेव्हां राजाला ते खरे वाटेना. त्याने स्वत: येऊन तो चमत्कार अव- लोकन करतांच तो चकित झाला, आणि त्याने त्या भिसूम बाहेर का- दून त्याचे ऐवजी त्या नरकाधिकाऱ्यास त्या तप्त तेलांत ढकलून मार- विले आणि लगेच त्या नरकस्थानाचा नाश करविला. मग त्या भिक्षुला मोठ्या सन्मानाने आपल्या राजमंदिरांत नेऊन त्याचे पासून त्याने धर्मोपदेश घेतला. तो धर्मोपदेश ऐकून राजाच्या मनाला पूर्ण उप- रति झाली. बुद्धावर त्याची श्रद्धा वसली, आणि तेव्हांपासून बौद्धधर्माचा [ मागलि पृष्ठावरून पुढे चालू. ] चीही मनाई नसल्यामुळे, पुष्कळ लोक आंत जात. परंतु एकदां आंत गेलेला मनुष्य पुनः कथा यत नसे. अशा रीतीने फसवन मनध्यवध करण्यांत अशोकाला मौज वाटे.