या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वतन-वृत्ति. ३१ (हुशार) ह्या संस्कृत शब्दापासून निघाला असावा; अथवा पट्ट म्हणजे मुख्य ह्या शब्दापासूनही तो निघाला असेल. कौलाला पट्टा म्हणतात, व इजारा म्हणजे मता. ज्यावरून गांवाचें बाबवार घेणें देणें समजतें अशा गांवाच्या जमाबंदीच्या ताळेबंदाला पट्टा किंवा इजारपट म्हण' तात, व तो पाटलाजवळ असतो, आणि पाटील त्याप्रमाणें वसूल करतो. हजिरीच्या तत्तयालाही हजिरीपट किंवा पट म्हणतात. पाटील, पटवारी (कुळकर्णी) हें जुळे पट किंवा पट्टा या शब्दांवरून बरेंच संभाव्य दिसतें. ज्यांजवळ पट्टा किंवा पट असतो आणि त्याबरहुकूम जे पट्टी, सारा, अगर सार्वजनिक वर्गणी वसूल करतात ते पाटील-पटवारी. तेव्हां सबंध जमातींत जो स्मरणाचा धड असून लोकांवर ज्याचें वजन आहे अशा बुद्धिमान् व मुख्य माणसाजवळच जातीचा पट रहावयाचा. कानडी मुलखांत पुष्कळ जातपाटलांना नाईक, गौडा, किंवा · बुधवंत (बुद्धिवान्) म्हणतात; व सिंध-गुजराथेंत मुखी, अगेवान म्हणतात. पाटील पसंत केला असेल. कोणत्याही बाजूनें पाहिलें तरी पाटील हा असामान्य गुणाढय असला पाहिजे, हें उघड होतें. म्हण्न असें अनुमान 'निघतें कीं, मूळ पाटील हा समाजस्थैर्यंरक्षणास व समाजाभिवृद्धि करण्यास योग्य असा लोकांनीं निवडलेला पुरुष असावा; आणि वतनाची कल्पना दृढ होईपर्यंत पाटीलकी लोकांच्या पसंतीवर अवलंबून असावी. स्वयंपाकाचे अनेक पदार्थ शिजविण्यास बोघोण्या ( पातेलें ) सारखें दुसरें एकही पात्र नाही; म्हणून त्याला बहुगुणी म्हणतात. बहुगुणी याचा अपभ्रंश ब्राह्मणांत बोघोणें व ब्राह्मणेतरांत बघुलें किंवा भगुलें असा झाला आहे. त्याप्रमाणें चौगुला हा शब्द चौगुणी ह्या शब्दापासून निघाला असावा. चार ह्याचा अर्थ अनेक. जसें-चार लोक गोळा झाले. चौ-गुणी म्हणजे अनेकगुणी, अथवा चौगुला म्हणजे चौ-चारचौघे गोळा