पान:अस्पृश्य -विचार.pdf/188

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

डुकानदारा. १६७ संबंधानें मात्र ही म्हण उफराठी दिसते. कोठं कोठं सावकार लोक ह्यांना रखवालीसाठीं किंवा तगाद्यासाठीं चाकरीस ठेवितात. हे लोक बहुधा व्याजबद्वयाचा धंदा करितात, आणि कांहीं उधारीनें कापड, सुन्या, चाकू, कात्री, सुरमा, औषधी, खोटे दागिने, डे, नोटा वगैरे विकतात. मेंढवाड्यांत जसा लांडगा उतरावा तसा इकडील लोकांत पठाण, अशी स्थिति आहे. ज्याला कोठंही कर्ज किंवा उधार माल मिळत नाहीं, तें पठाणांचें गि-हाईक. परंतु अलीकडे बरे म्हणविणारे शेतकरी व किरकोळ उदमीही त्यांजपासून कर्ज घेऊं लागले आहेत. ते तारण किंवा दस्तैवजा घेत नाहींत, आणि हंगामापर्यंत वाट पाहण्याचें कबूल करतात. त्यांमुळे गि-हाइकाला बरें वाटतें, आणि मग रुपयाला दरमहा एक तें चार आणे सुद्धां व्याज किंवा नफा देण्याचें तें कबूल करतें. सरासरीनें त्यांचें व्याज दरमहा दर रुपयाला दोन आणे पडतें. यदाकदाचित त्यांनीं दस्तैवज करून घेतला तर ते त्यांत कर्जाचे तिप्पट रकमेचा भरणा दाखवितात, आणि स्टँपाचा खर्च, मनोती, महिन्याचें व्याज, धर्मफंड अगाऊ कापून घेऊन बाकी रकम कुळाच्या पदरांत टाकतात, असा चहूकडे बोभाटा आहे. एका रोहिल्यानें कोर्टापुढ़े साक्षीत सांगितलें कीं, मुसलमानांजवळून व्याज घेणें निषिद्ध असल्यामुळे आम्ही मुसलमानांकडून व्याज घेत नाहीं. इकडील मुसलमानांना ही ढील मिळते हैं त्यांतलें त्यांत बरें आहे. पण तिचा सर्व वचपा ते हिंदूंवर काढतात. उगवणीसाठीं त्यांना स्टैंप, राजट्रकचेरी, किंवा कोर्ट यांची गरज लागत नाहीं. वायदा भरला कीं, दृश्न तान जवान पलटणीतूल्या पुण्यासारखा पोषाक करून चाबूक साट घऊन निघतात, आणि तांबडे फुटलं नाहीं तोंच ते आकाळ विक्राळ स्वरूपानें कुळाच्या दारांत दत्त म्हणून उभे राहतात. फिरून ये म्हटलें कीं, आपल्याभंवतीं चक्र देऊन तेथेंच उभे, दम धर म्हटलें कीं नाक दाबलेंच. कुळाला उसासा म्हणून ते टाकू देत नाहीत, व बायकांना पाण्याला किंवा पुरुषाला कामाला देखील बराबाहेर निघूं देत