पान:अस्पृश्य -विचार.pdf/91

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

99. गांव-गाडा. ल्ह्याच्या ठाण्यांत सरकारी दवाखान्यांत आजारी माणसांना औषधपाणी ह्यांवर जिल्हानिहाय संनिटरी इन्स्पेक्टर नेमलेला असतो. gi स्वाने जिल्ह्यांच्या ठिकाणीं झाले आहेत, आणि कोठं कोठं तालुक्यांतही झाले आहेत. त्यांत जनावरांना औषधोपचार व शस्त्रक्रिया करण्यांत येते. ओव्हरसिअर ऑफ अॅग्रिकल्चर ह्याची देखरेख जिल्ह्यांतल्या शेती खात्यावर असते. दोन किंवा अधिकू जिल्हे मिळून टपाल, व तारायंत्र खात्यांची व्यवस्था पेस्टचे सुपरिंटेंडंट पाहतात. बहुतेक स्वात्यांच्या जिल्हाधिका-यांना मदतनीस आहेत. सबंध जिल्ह्यांतील नगदी कामासाठीं हुजूर डेप्युटी कलेक्टर नांवाचा अधिकारी कलेक्टरच्या दिमतीला दिला असतो; आणि पैमाषसंबंधों कामें पाहण्याला डिस्ट्रिक्ट इन्स्पेक्टर ऑफ लँड रेकार्डस दिलेला असतो. जिल्ह्यांतील दोन ते चार तालुके मिळून मुलकी कामासाठीं जो पोटविभाग करतात, त्याला * प्रांत ” म्हणतात, व त्यावर असिस्टंट किंवा डेप्युटी कलेक्टर नेमतात. तो आपल्या प्रांतापुरतीं कलेक्टरचीं बहुतेक मुलकी, फौजदारी कामें पाहतो. असिस्टंट किंवा डेप्युटी सुपरिंटेंडंट ऑफ पोलीस व सर्कल पेोलीस इन्स्पेक्टर हे डिस्ट्रिक्ट पोलीस सुपरिंटेंडंटचे मदतनीस असतात, आणेि त्यांकडे कांहीं तालुके दिलेले असतात. एंजिनीयर खात्यांत कांहीं सडका व कामें मिळून सबूडव्हिंजन करतात. त्यावर सबडिव्हिजनल ऑफिसर नेमतात, व तो एक्झिक्युटिव्ह एंजिनीयरचे ताब्यांत असतो. डेप्युटी एज्युकेशनल इन्स्पेक्टरला असिस्टंट डेप्युटी मदतनीस असतात, आणि सर्व मिळून जिल्ह्यांतील शाळांची तपासणी, स्थापना वगैरे व्यवस्था पाहतात. पोस्टल सुपरिंटेंडंटचे हाताखाली पेस्टाचे इन्पेक्टर असतात. ते जिल्ह्यांतील टपालखात्यावर देखरेख करतात. दार, सबरजिस्ट्रार, रेंज फेरिस्ट ऑफिसर, कस्टम, मोठ, एक्सेज सायके