पान:अस्पृश्य -विचार.pdf/92

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वतन-वेतन. ૭૬. सरकारकून, दरोगे, बंदर कारकून, सब्इन्स्पेक्टरवगेरे, सब असिस्टंट सर्जन, सब्बाओव्हरसियर किंवा मेस्त्री,शाळामास्तर,पोस्टमास्तर,देवीडॅक्टिर इत्यादि होत. काळीच्या व इतर करांचा वसूल, खंडाच्या, वहिवाटीच्या व साधारण गुन्ह्यांच्या फिर्यादींचा इनसाफ, नगदी, वतन, हॉक, जर्मिनीच्या खात्यांची वारस चौकशी, प्रेग, पटकी, दुष्काळ, तगाई, पतपेढ्या, शेतकी सभा, इत्यादि संबंधानें कामें मामलेदाराकडे चालतात. साधारणत: जिल्ह्याचीं जशीं सर्व कामें कलेक्टरमार्फत चालतात, व एकंदर जिल्ह्याच्या ब-याचुन्या स्थितीबद्दल कलेक्टरवर जबाबदारी असते, तशी तालुक्यांसंबंधानें सर्व कारवाई मामलेदारमार्फत चालून तालुक्याच्या स्वस्थतेबद्दलची जोखीम मामलेदारावर असते. तालुक्याचे दप्तरी व फिरतीच्या कामाच्या मानानें मामलेदाराच्या हाताखालीं ६ ते १६ सोळा कारकून व १० ते २० शिपाई असतात. तालुक्यांतील सर्व खेड्यांचे मिळून दोन ते चार भाग केलेले असतात,त्यांना सर्कल म्हणतात. त्यावर जो मामलेदार-कचेरीतला कारकून असतो, त्याला सर्कल इन्स्पेक्टर म्हणतात. आपल्या सर्कलांतील गांवांची दतरतपासणी, पीकपाहणी,मो- जणी,वांटप,बांध-उरुळ्यांची दुरुस्ती, अतिक्रमण, वसूल वगैरे कामें सर्कल इन्स्पेक्टर मामलेदाराच्या हुकमतींत करतो. गांवकामगार व तालुका कामगार ह्यांमधील सांस्वळीची कडी सर्कल इन्स्पेक्टर होत. तालुक्यांत गुन्हे न होतील अशी खबरदारी घेण्याचें, व झाल्यास त्यांचा पता लावण्याचें काम सब्इन्स्पेक्टर ऑफ पालीस करती, व त्याचे मदतीस हेड कॉन्स्टेबल्स व सुमारें तीस ते पन्नास कॅन्स्टेबल्स असतात. त्यांत दहा पंधरा हत्यारी व बाकीचे आड-हत्यारी असतात. तालुक्यांत एकाहून अधिक सब्रुइन्स्पेक्टर नेमण्यास सुरुवात झाली आहे. तालुक्याचा बंदोबस्त नीट रहावा म्हणून त्यांत दोन चार पेस्त अथवा पोलीस ठाणीं असतात, जाणि त्यावर हेड कॉन्स्टेबल, एक दोन हत्यारी व दोन चार आड-हत्यारी कॉन्स्टेबल्स असतात. ह्यांना आपापल्या हद्दींत नेहमीं फिरावें लागतें. अबकारी, कस्टम, मीठ खात्यांचे