पान:अस्पृश्य -विचार.pdf/93

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

V9q गांव-गाडा, आधकारी आपापल्या खात्यांचीं कामें करतात. फॅरेस्टचे विभाग करून त्यांवर राउंडगार्ड, बीटगार्ड नेमतात. ते आपापल्या हद्दीत फिरून रेंज फॅरेस्ट ऑफिसरच्या हुकमतींत कामें करतात. स्थावर-जंगमचे दस्तैवज सबू रजिस्ट्रार नॉदितो. देवीडक्टर गांवोगांव देवी काढीत फिरतो. तालुक्याचे ठिकाणीं दवाखाना असतो, तेथें सबूआसिस्टंट सर्जन रोग्यांना औषध देतेो. बुळकुंड्या, खुरकत वगैरेसारखे जनावरांच्या सांथीचे रोग उद्भवले म्हणजे तालुक्यांत गुरांचा दवाखाना नसल्यास नजीकच्या दवाखान्यावरील ढोर-डॅक्टर येऊन उपचार करतो. सडका वगैरेंचें काम एंजिनीयरकडील सब्बाओव्हरासियर, मेस्त्री पाहतात. खेड्यांतील कांहीं शाळा-मास्तरांकडे शाळा वाटपाल असतें. शाळेसंबंधाचें त्यांचें कामतालुका शाळामास्तरमार्फत व टपालचें सबू-पोस्टमास्तरमार्फत चालतें. पोस्टांत चार आणे तें पांच हजार रुपयांपर्यंत तीन टके व्याजा लोकांच्या ठेवी ठेवतात, व हुंड्या (मनिऑर्डरी) पाठवितात. स्थावर-जंगमाचे दाब्याच्या निवाड्यासार्टी एक दोन तालुके मिळून सर्वोर्डिनेट जज ऊर्फ मुनसफ कोर्ट असतें. वरीलप्रमाणें पगारी चाकरीखेरीज कांहीं सार्वजनिक कॉमें सरकारर्ने लोकांच्या विश्वासू पुढा-यांवर बिन-पगारीं सौंपविलीं आहेत. फौजदारीं कामें चालविण्यास शहरांत मानाचे मॅजिस्ट्रेट नेमले आहेत. तसेंच शेतक-यांचे दहा रुपयांचे आंतील दावे चालविण्यासाठीं शेतकरी कायद्याप्रमाणें कांहीं कांहीं गांवांत बिनपगारी गांवमुनसफ नेमले आहेत. पण ते कमी करून गांवपंचायतीकडे हलके दिवाणी दावे देण्याचें घाटत आहे. मुंबईचा १९०१चा कायद्या ३-डिट्रिक्ट म्युनिसिपल आक्टान्वयें मोठ्या शहरांतून सार्वजनिक आरोग्यरक्षुण व प्राथमिक शिक्षण हीं कामें म्युनिसेिपालिट्यांकडे सोंपवून त्यांचा खर्च भागविण्यासाठीं त्यांना नागरिकांवर व त्यांच्या व्यापारावर क्र बसविण्याचे अधिकार दिले आहेत. म्युनिसियलिटीचा कारभार कांहीं लोकनियुक्त सभासद व कांहीं सरकारने - लेले सभासद ह्यांच्या विचारानें चालते, आणि तिच्या एकंदर व्यवस्थे