हे पान प्रमाणित केलेले आहे.

फ्रेनी


 अ‍ॅलिस फक्त एक साहसिनी होती. त्यापेक्षा जास्त काही नाही. त्या काळात असे पुष्कळ इकडे आले. सुमार बुद्धी, बेताचा सामाजिक दर्जा, जेमतेम चरितार्थापुरता पैसा. फक्त त्यांच्यातल्या काहींच्यात आपल्या देशात आपल्याला फार काही मिळवण्याची संधी नाही हे उमजण्याची अक्कलही होती आणि ते मिळवण्याची महत्त्वाकांक्षाही होती. अशांना वसाहतींसारखं उत्तम ठिकाण दुसरं कुठलं ? आपल्यासारखे नशीब काढायला आलेले मूठभर देशबांधव आणि गोऱ्या कातडीला पूजनीय मानणारी नेटिव प्रजा. इथे काहीही घडू शकतं. आपण घडवू शकतो. फक्त देश सोडायची तयारी पाहिजे आणि जुगाऱ्याचा पिंड पाहिजे. बस्स. इतकंच.

 ही त्यातलीच एक. घरची गरिबी. मुलांच्या गोष्टीतली जाच करणारी सावत्र आई. आईच्या कलानं चालणारा बाप. सोळाव्या वर्षी ती शाळा सोडून नोकरी करायला लागली आणि दैवाच्या एका फटक्यात तिला कायमचं घर सोडून जायची संधी मिळाली. तिच्या डोळ्यांना म्हणे कसला तरी विकार झाला आणि तिची दृष्टी एकदम

फ्रेनी-३