या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उज्ज्वला



 ॲलिसबद्दल मला सगळ्यात काही आवडलं असलं तर ते म्हणजे तिचा बिनधास्त स्वभाव. ती आयुष्य आपल्याला रुचेल तसं जगली आणि अमुक केलं तर कोण काय म्हणेल ह्याचा तिनं विचार केला नाही. कदाचित फ्रेनी म्हणाली तसं ती ह्या समाजाचा भागच नव्हती. त्यातून ह्या देशावर राज्य करणाऱ्यांच्या वंशाची, गोऱ्या कातडीची. मग इथले लोक काय म्हणतील ह्याची फिकीर करायचं तिला काय कारण होतं ? आणि केली नाही तर त्यात एवढी कौतुकाची बाब काय ? पण खरं म्हणजे ती पहिल्यापासून स्वतःला इथल्या समाजाचा घटक समजली. गोऱ्या कातडीचा दर्प तिच्या वागण्यातून मला कधीच जाणवला नाही.
 एकदा हा देश आपला मानल्यावर इथे आल्यापासूनच्या उण्यापुऱ्या पन्नास वर्षांत ती फक्त दोनदा इंग्लंडला जाऊन आली. ती सुद्धा पहिल्या वीस-पंचवीस वर्षांत. त्यानंतर ती गेली तर नाहीच, पण तो देश, तिचं घर, कुटुंबातली माणसं ह्यांच्याबद्दलच्या आठवणींचे उमाळे तिनं कधी काढले नाहीत. तिच्या भावाकडून दर

उज्ज्वला - १७