या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उज्ज्वला


 आणखी थोडे दिवरा जगती तर ॲलिस एक्काहत्तर वर्षांची झाली असती. आज तिचा वाढदिवस आहे. मला आठवतंय मला खूप गंमत वाटायची ती मित्रमंडळींना बोलावून आपला वाढदिवस साजरा करायची त्याची. मुलं लहान असताना आई-वडलांनी त्यांचे वाढदिवस साजरे करायचे हे ठीक आहे, पण चांगल्या वाढलेल्या माणसानं आपणच आपला वाढदिवस साजरा करायचा हे मला जरा चमत्कारिक वाटायचं. पाहुणे फुलांचा गुच्छ नाहीतर चॉकलेटची पेटी किंवा वाईनची बाटली घेऊन यायचे आणि कुणाशी हस्तांदोलन करीत तर कुणाच्या पुढे गाल करीत ती त्यांच्या शुभेच्छा स्वीकारायची. उत्सवमूर्ती आणि यजमानीण अशी दुहेरी भूमिका ती मोठ्या कौशल्याने पार पाडायची.
 अलिकडे बऱ्याच वर्षांत असा योग आला नव्हता, पण आज मला त्या फार पूर्वीच्या वाढदिवसांची आठवण आली. पेले हातात घेऊन उभे असलेल्या पाहुण्यांच्यातून सुळसुळीत केस थोडेसे उडवीत चालणं, कुठे थांबून एखाद्याशी दोन शब्द बोलणं - तिचा

उज्ज्वला – ६३