या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रुष्ट सुंदरीस - - बोल ! बोल ! आतां सखये ! सोडुनी अबोला प्रेम-हांक एकच देई हृदय-वल्लभाला ! ॥ ध्रु० ॥ घोर रात्र नैराश्याची जाय ओसरोनी दिव्य, सौख्य, आनंदाची प्रभा ये फुलोनी दिशा पूर्ण साज्या हंसती मोकळ्या मुखांनी हाय ! तूंच कैसे वरिलं मौन त्या व्रताला ? गोड गान जिकडे तिकडे मधुर सुस्वराने विहग गाति वृक्षांवरुनी उड्डुनि कौतुकानें सूर तोच संगीताचा गावया जुटीनें घाळशील आळा मनिंच्या कधीं रोदनाला ? एकजात फुलली पुष्पें; विश्व जणूं ढोले वास गोड मकरंदाचा दरवळून खेळे भ्रमर त्यांत फिरुनी जे जे करिति प्रेम चाळे अर्थ तोच तव जीवाला- उकलवूं कशाला ? नभांतून दंव मोत्यांसी ढाळतात तारा लता बागबगिच्यांमधुनी फुलांना झरारा ! ग्रहण योग संपुनि, टाकी अश्रु-प्रेम-धारा भेट रोहिणी दे चंद्रा !-धीर ना मनाला !! प्रकाशन – ज्ञानप्रकाश; विहार - जाति - मोहिनी - २० - -