पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/104

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जेवतो. पाट ते डायनिंग टेबल या विकासातल्या पाऊलखुणा आज आपल्या घरी आपण जपल्यात का? म्हणजे आज घरात पाटपण नसतो. पूजेसाठी शेजारच्या घरातून तो आणायला लागतो. अशी आपल्या घरची स्थिती आहे. अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील. अगदी साधी गोष्ट म्हणजे आपल्या खिशाला असलेले पेन. पेन एकेकाळी सगळ्यात विकसित असे साधन होते. ते आता आऊटडेटेड साधन झालंय. आता तुमच्या खिशात पेनड्राईव्ह असावा लागतो. ही जी विकासाची बदलती परिमाणे आहेत ती ज्या समाजामध्ये जतन केली जातात, जोपासली जातात तो समाज स्वशिक्षित, सुसंस्कृत, प्रगल्भ मानला जातो.

प्रश्न - सर, विचार करत असताना सर्वसाधारण व्यक्तीचा असा समज आहे की पूर्वी साहित्य नव्हते, लेखनाची साधने नव्हती, शैली नव्हती, मौखिक पद्धतीने आपण ज्ञानाचे संक्रमण एका पिढीकडून दुस-या पिढीकडे करत असायचो. पण आता ही सगळी साधने उपलब्ध झाली आहेत. पण या सर्व साधनांचा संग्रह नि विस्तार आपल्या घरामध्ये करत बसलो तर यासाठी आपणास कित्येक घरे लागतील नाही का?

उत्तर - विस्ताराची गोष्ट अशी सांगेन की आता तर ज्या एकविसाव्या शतकात आपण जगत आहोत तिथे खरे म्हणजे १x१ मिलीमीटरमध्ये सगळे जग सामावून घ्यायची कला आपण आत्मसात केली आहे. विस्तार भयापोटी आपण पुरातन वस्तू जपत नाही हे खोटे आहे. खरे हे आहे की आपणात जतनाची जाणीव नाही. एक साधा प्रश्न मी तुम्हालाच विचारतो. तुमच्या जीवनातल्या किती गोष्टी तुम्ही जपल्यात? तुमचे वय पन्नास वर्षे आहे असा माझा अंदाज आहे. गेल्या पन्नास वर्षातल्या व्यक्तिगत जीवनातल्या पाऊलखुणा तुम्ही जपल्या आहेत का? गतायुष्य जपलं आहे का?

प्रश्न - गतायुष्य न जपण्यामागे माझे अज्ञान आहे की दुर्लक्ष ?

उत्तर - खरं उत्तर द्यायचे तर मी सांगेन की जाणीवांचा अभाव जतन साक्षरता ही एक जाणीव आहे आणि ती माणसाने सहेतुक जोपासायला हवी. साधी गोष्ट आहे की माझे हस्ताक्षर. मला आठवते की मी शिक्षक झालो नि विद्याथ्र्यांच्या गृहपाठाच्या विद्याथ्र्यांचे हस्ताक्षर सुवाच्च नव्हते. कुत्र्या-मांजराचे पाय असे त्या विद्याथ्र्यांचे हस्ताक्षर होतं. मला खाली शेरा लिहायचा होता की ‘हस्ताक्षर सुवाच्च असावे'. माझं हस्ताक्षर तो शेरा लिहिण्याइतकं सुवाच्च नव्हतं. मी त्या दिवशी तो शेरा लिहिला नाही. महिन्यानंतर लिहिला. दरम्यानच्या

आकाश संवाद/१०३