पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/51

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात भारतवर्षाच्या चारी बाजूला इंग्रजी सत्ता आणि सैन्याचा दबदबा होता. त्या वेळी इंग्रजी सत्तेत हिंदुस्थानी सैनिकसुद्धा असत. पण त्यांचे काम इंग्रजांच्या इशा-यावर नाचणे असे. हिंदुस्थानी शिपायांच्या आज्ञा पालनाविषयी ते पूर्ण परिचित होते. नंतरच्या काळात इंग्रजांनी हिंदुस्थानी शिपायांविरुद्ध दमन आणि अत्याचाराची नीती अवलंबिली. विशेषतः भारतीयांत स्वातंत्र्याची मुळे जोर धरू लागल्यानंतर तर या नीतीधर्म, जातीपातीचा भेद यासारख्या तत्त्वांना साधन म्हणून वापरणे सुरू केले. हिंदुस्थानीयांचा अनादर करणे, हिंदू-इस्लामबद्दल बोलून एकमेकांबद्दलचा मनात तिरस्कार निर्माण करणे, ख्रिस्ती धर्माच्या प्रसार आणि प्रसाराला प्रोत्साहन देणे यासारख्या गोष्टी आता रोजच्याच झाल्या होत्या. याचा परिणाम असा झाला की इंग्रजी सेनेत असणाच्या हिंदुस्थानी शिपायांचा क्रोध आणि बदल्याची आग भडकू लागली. हिंदू शिपायांना कपाळावर कुंकवाचा टिळा लावण्यास बंदी करण्यात आली. त्या वेळी हिंदू लोक समुद्रपार करण्यास पाप समजत होते. हे बघून मुद्दाम हिंदुस्थानी पलटणींना जहाजाने विदेशी पाठवू लागले. बंदुकांना लागणाच्या काडतुसांना चरबी लावण्याची गोष्ट आता जुनी झाली होती. या सगळ्याविरुद्ध पहिला विरोध बराकपूर छावणीच्या पस्तिसाव्या पलटणचा बहादूर शिपाई मंगल पांडेने केला.

 मंगल पांडे जवान शिपाई होता. स्वभावाने सरळ दिसणारा हा शिपाई होता मात्र स्वाभिमानी. जन्माने ब्राह्मण असणारा मंगल पांडे धर्मपरायण होता. त्याच्या धर्मनिष्ठेबाबत छावणीतील सगळे परिचित होते. एवढेच नव्हे इंग्रजसुद्धा. २९ मार्च, १८५७ ची गोष्ट आहे. त्या दिवशी छावणीत कानोकानी ही बातमी पसरली की, पलटणीला जाणूनबुजून धर्मभ्रष्ट केले जात आहे. त्या वेळी सैन्यात ब्राऊन बेस बंदुका वापरत. आता त्यांच्याऐवजी एनफिल्ड बंदुका वापरायला देण्याची शक्यता होती. बंदुका छावणीत आणल्यादेखील होत्या. त्यासाठी वापरल्या जाणा-या काडतुसांना गाय आणि डुकराची चरबी लावली आहे ही गोष्ट वणव्यासारखी पसरली. या बातमीने मंगल पांडेसारख्या धर्मप्रिय शिपायाच्या डोळ्यांतून आग भडकणे स्वाभाविकच होते. हिच ती वेळ होती, जेव्हा सैन्यात झाशी, बिठूर, ग्वाल्हेर इ. ठिकाणाहून बंडाचे निरोप मिळत होते. त्या वेळी प्लासीच्या लीढाईची शताब्दी साजरी केली जाणार होती. २१ जून, १८५७ पूर्वी इंग्रजी सत्तेला नष्ट करण्याचा निश्चय केला गेला होता. यासाठी ३१ मेचा मुहूर्तसुद्धा निश्चित झाला होता. पण देश आणि वचनाचा पक्का शिपाई मंगल पांडे आपल्या उसळत्या रक्ताला आवरू शकला नाही. त्याने संपूर्ण छावणीत चक्कर टाकून बंड करण्याची घोषणा केली. देश स्वातंत्र्याच्या

आकाश संवाद/५०