पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/66

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गर्तेत ढकलण्यास पुरेशी असतात. आज त्यांना सुधारण्याची, सन्मार्गी लावण्याची सर्व व्यवस्था आहेत. असा प्रयत्न अत्यंत गंभीरपणाने होत आहे. पण आज या मुलांच्या परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी खरे प्रयत्न संस्थांनी नाही, समाजाने करावयाचे आहेत.
 बाल गुन्हेगारांच्या पालन पोषण आणि त्यांच्या पुनर्वसनाचे काम करणा-या या संस्थांकडे समाजाचा, आपल्या सगळ्यांचा अनुदार दृष्टिकोन चिंतेचा विषय बनला आहे. मी आपल्याला एक प्रश्न विचारू इच्छितो की आपल्या गावात असणा-या या मुलांची देखभाल करणाच्या रिमांड होम, अनाथाश्रमाच्या संस्थांना तुम्ही कधी भेट दिलीत का? या संस्थांना आपली मदत आहे या सर्व प्रश्नांबद्दल आपले उत्तर नकारात्मक आहे. जोपर्यंत आपण या उत्तरांना होकारात्मक बनवित नाही तोपर्यंत या मुलांच्या स्थितीत काहीही परिवर्तन येणार नाही. दुर्भाग्याने, माणसाची खरी पारख आणि ओळख करणाच्या या संस्था एखाद्या हरिजन वस्तीसारख्या उपेक्षित राहिल्या आहेत. बदलत्या सामाजिक रचनेमुळे हरिजनांच्या वस्त्या गावात आल्या, पण या संस्था अजूनही अहिल्येच्या शिळेप्रमाणे उपेक्षित आणि अस्पर्श राहिल्या आहेत. गुन्हेगार मुलांच्या उद्धारासाठी आज संस्थांपेक्षा आपल्यासारख्या संवेदनशील राम मनाच्या सज्जनांची आणि सीतेसारख्या संयमी अशा देवीची आवश्यकता आहे की ज्या वनवासाच्या दुःखाचा अनुभव करून त्यापासून वाचण्याची व वाचवण्याची ज्यांच्यात जिद्द आहे. आज अपराधी आणि अनाथ मुलांना वेगवेगळ्या उपायांनी आपलेसे करण्याची जास्त आवश्यकता आहे. मनापासून स्वीकार केला तर त्यांना आपलेसे करण्याची क्रिया वेगात व्हायला पाहिजे. आपल्या मनात एक गैरसमज निर्माण झाला आहे. जरा विचार करा, शेवटी सरकार म्हणजे कोण? तुमच्या आणि माझ्याशिवाय सरकार थोडंच पूर्ण होणार आहे? सरकारात असणारा आपला वाटा आपण जोपर्यंत उचलत नाही तोपर्यंत सरकारची कोणतीही योजना ना कार्यान्वित होईल ना सफल.
 आज या बालगुन्हेगारांच्या बाबतीत सरकार खूप काही करत आहे. आता आपण पाऊल उचलले पाहिजे. आपल्याला अशा मुलांच्या खच्या पुनर्वसनासाठी कुठल्याही नोकरीपेक्षा आपल्या मनातील रिकामी जागा त्यांना दिली पाहिजे. अशा प्रयत्नांनीच त्यांची उपेक्षा दूर होईल. त्यांच्यात आत्मबल येईल, त्यांच्यात आत्मसन्मान जागृत होईल आणि मग बघा ते स्वावलंबी होण्यास वेळ लागणार नाही.

 योगायोगाने वयाच्या दहाव्या वर्षी मी बाल गुन्हेगारांच्या संपर्कात आलो. होय आणि तेही बाल गुन्हेगार नसताना. तेव्हापासून गेल्या तीस वर्षांपर्यंत बाल

आकाश संवाद/६५