या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आत्मविचार. त्यामुळे सर्व भ्रान्ती होत असून दुःखें भासतात. ते अज्ञान समूळ नष्ट झाल्यास सर्व दुःखें नाश होऊन पुन्हा उद्भव न होतां नित्यानन्दसुख- प्राप्ति होते. यावरून ज्या पुरुषाचे निष्कामकर्माचरणे चित्त शुद्ध झाले व प्रपंचदुःखांतून सुटण्याची अत्यन्त उत्कटेच्छा असून साधन- चतुष्टययुक्त आहे तो ज्ञानाधिकारी होय. ती साधनें विवेक, वैराग्य, शमा- दिषट्क संपत्ति, मुमुक्षुत्व अशी चार आहेत, त्यांचे प्रकार:- ब्रम्हात्मा, अविनाशी, अचल व जगद्विशालरूपचल या सत्यासत्य विचाराचे नांवच विवेक. हा विवेकच सर्व साधनांचे मूळ आहे, विवेक असल्याने वैराग्यादिक उत्तरसाधने होतात. विवेकरहित उत्तरसाधनें होत नाहीत, विवेकावांचून वैराग्य, अंध व वैराग्याविना विवेक पंगु असतो. जसा मार्ग जाणत असून पाय नाहीत तो पंथ चालण्यास असमर्थ आणि पाय असून नेत्र नाहीत तोही मार्ग चालण्यास अशक्त, तस्मात् अंधाश्रयें पंगू मार्ग दाखवून पंगूचे आधारे अंध चालतो अशीच विवेक वैराग्याची सांगडे असली तरच परमार्थ साधतो, यांत मी कोण, जगत काय, ईश्वर कोण कसा, सत्य काय, असत्य काय यांचा निरंतर विचार व सत्यग्राह्य असत्यत्याज्य इत्यादि नित्यानित्यवस्तुविचार म्हणजे ब्रम्हात्मा सत्य, जगज्जीवादिकमिथ्या असा दृढ निश्चय यास विवेक म्हटला आहे. वेदा- न्तार्थाने सकल जगत्पदार्थ मिथ्या समजून ब्रम्हादिलोकपर्यंत भोग- तुच्छ जाणून जशी मूत्रपरिषादिकांकडे इच्छा संभवत नाहीं तशी मनापा- सून त्यागबुद्धि यास वैराग्य म्हणतात. शमादिषट्कसंपत्ति म्हणजे शम, दम, तितिक्षा, उपरति, श्रद्धा, समाधान अशी सहा सांगितली आहेत; ती अंतरेंद्रियमनोनिग्रह सर्व विषयपदार्थ अनित्य जाणून सदोदित विष- याकडून मन वळवून परमात्मी ऐक्य करणे यास शम म्हणतात. ज्ञान १ जोड. २ खोटे.