आत्मविचार. प्रथम माता गीत धारण करते आणून देह मातेचा होय पित्या- वांचून माता गर्भ धारण करण्यास असमर्थ तर देह पित्याचा झाला, भार्या सर्व नीवित वेचून सेवेत राहते, यास्तव देह स्त्रीचा होत आहे, पुत्र, कन्या, भ्राता, स्वजनादिक अनेकप्रकारे रंजन करतात तर देह त्यांचा होय जीविकार्य स्वामीस देह विकला जातो म्हणून देह स्वामीचा होतो, सर्वानुमतें शेवट देह अग्रीस देतात, तर देह अग्नीचा झाला; श्वान शृगालादिकांचे खाद्य आहे तस्मात् देह त्यांचापण होतो इत्यादि अनंत विभागी असून आपणही देह माझा म्हणून भोगे- रमें सुखदेण्याचे ऐवनी शरीरास सहस्रशः कष्टाने दुःख मात्र देतात, हे प्रत्यक्ष अनुभवी दिसत असून अविचाराने अनेक अकृत्ये करून मन्ममरणादिक दुःखास निमंत्रण करून घेतात ते. अतिमूढच म्हटले पाहिजेत. कारण विषमिश्र आहे. असें एकदां खचीत् कळल्यावर मरण भयाने तो पदार्थ मूर्खही सेवन करीत नाही किंवा हे माझे सुखाचे साधन आहे की दुःखाचे आहे इतके ज्ञान पश्वादिकांसही आहे मनु- प्याचे हातांत धान्य खाद्य दिसले तर जवळ येतात, कोठी दिसली तर दूर होतात, यावरून योग्यायोग्य · पशही जाणतात मग. मनुष्यास तर ज्ञान विचार स्पष्ट आहे म्हणजे पुण्यस्य फलमिचंति पुण्यं नेच्छति मानवा: फलं नेच्छति पापस्य पापं कुर्वति यत्नतः ॥ मुखाचे साधन पुण्य दुःखाचे, साधन पाप हे जाणत असून सुखाची इन बाळगून पुण्यकर्म करीत नाहीत, 4 दुःख नसावें ही इच्छा ठेवून पापकर्म यलाने करतात, या प्रकारें जो देहेद्रिय पटु असतांही मी ने कर्म करतों हे साधन सुखाचे आहे. वा दुःखाचे आहे; असा विचार न करील तो आपणच आपला वैरी होय निवतसर्प हाती
पान:आत्मविचार.djvu/५८
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही